पीएम ड्रोन दीदी योजना काय आहे ?

महिला बचत गट ड्रोन योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतकऱ्यांना खत आणि कीटकनाशकांच्या फवारणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करता यावा. 

महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून खर्चाच्या 80% अनुदान किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये मिळतील .

पीएम ड्रोन दीदी योजनेतील लाभार्थी महिलांना 15 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याअंतर्गत त्यांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना दरमहा १५००० रु.रक्कम ही दिली जाणार आहे 

या योजनेमुळे केवळ स्वयंसहाय्यता महिलांनाच फायदा होणार नाही तर शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणेही शक्य होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.

प्रधानमंत्री ड्रोन दीदी योजना देशातील सर्व शेतकरी जे शेती करतात ते या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच या योजनेसाठी फक्त भारतीय महिलाच पात्र आहेत. आणि महिलेचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे

 आधार कार्ड पॅन कार्ड फोन नंबर ई – मेल आयडी  पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो बचत गट प्रमाणपत्र बँकपासबुक इतर कागदपत्रे 

पीएम ड्रोन दीदी योजनेसाठी कागदपत्रे

अधिक माहितीसाठी