Kanya Sumangala yojana । सुमंगला योजना लिस्ट । कन्या सुमंगला योजना पात्रता । कन्या सुमंगला योजना PDF । मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना । युपी कन्या सुमंगला योजना अर्ज । उत्तरप्रदेश कन्या सुमंगला योजना फॉर्म । कन्या सुमंगला योजना नोंदणी
आपल्या समाजात मुलींबद्दल नेहमी नकारात्मक विचारसरणी आणि भेदभाव यामुळे मुलीला नेहमी त्यांचे आरोग्य व शिक्षण या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागते. या समाज संकटाना दूर करण्यासाठी आणि नकरात्मक विचारसरणी सुधारण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरु केली आहे. मुली आणि महिलांना सामाजिक सुरक्षेबरोबर विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने ही योजना सुरु केली आहे.
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना या लेखाद्वारे तुम्हाला उत्तरप्रदेश कन्या सुमंगला योजना संबंधित संपूर्ण माहिती, पात्रता, फायदे, वैशिष्ट्ये, कागदपत्रे आणि सुमंगला योजेसाठी अर्ज कसा करावयाचा ही संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळेल.
Kanya Sumangala yojana 2022
योजनेचे नाव | मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना |
सरकार | उत्तरप्रदेश सरकारने |
विभाग | महिला आणि बाल विकास विभाग उत्तरप्रदेश |
लाभार्थी | मुली |
अर्ज | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
बजेट | १२०० कोटी रुपये |
वस्तुनिष्ठ | राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी |
योजना सुरु झाल्याची तारीख | २५ ऑक्टोबर २०१९ |
हप्ते | ०६ |
कन्या सुमंगला योजनेचे उद्दिष्ट्ये :
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांमध्ये नकरात्मक विचारसरणी आहे तीचे सकरात्मक दृष्टीकोन मध्ये निर्माण करणे त्याद्वारे भृणहत्या, बालविवाह रोखणे आणि मुलगी आणि मुलगा यांच्यातला भेदभाव कमी करणे हा आहे.
हे ही वाचा सुकन्या समृद्धी योजना
कन्या सुमंगला योजनेचे फायदे :
- मुलीच्या जन्मावर २००० रुपये दिले जाते.
- लाभार्थीचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. त्यामुळे मिळणारी रक्कम बँकेत जमा होते.
- अर्जदार या योजनेसाठी ऑनलाईन मोफत अर्ज करू शकता.
- या योजनेचा लाभ कुटूंबातील जुळ्या मुलींना ही होणार आहे.
- योजनेद्वारे मिळणारी रक्कम थेट बँकेत वर्ग केली जाते.
- राज्यातील एक कुटूंबातील दोन मुलींना याचा लाभ मिळणार आहे.
- जर एखाद्या कुटुंबाने दत्तक मुली घेतल्या असतील तर त्या २ मुलींना ही या योजनेचा लाभ होणार आहे.
कन्या सुमंगला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शैक्षिणक पात्रता प्रमाणपत्र
- बँक खाते
- मोबाइल नंबर
- शिधापत्रिका
- पत्ता पूरावा
- मुलगी दत्तक घेतल्यास दत्तक प्रमाणपत्र
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना : Kanya Sumangala Yojana
कन्या सुमंगला योजनेच्या पात्रता :
- लाभार्थी उत्तरप्रदेश चा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र असावे. उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि वीज बिल
- लाभार्थीच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक नसावे.
- एका कुटुंबात फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येता आहे.
- जर एखाद्या कुटुंबात अनाथ मुलीना दत्तक घेतली.आणि त्यांच्या घरातील २ मुलीं आणि घेतलेल्या २ दत्तक मुली यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- जर एखाद्या कुटूंबात २ पेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
- जर एखाद्या महिलेला पहिल्या प्रसूतीनंतर मुलगी झाली असेल. आणि दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस २ जुळ्या मुली झाल्या तर त्या ३ ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
हे ही वाचा पीएम किसान सम्मान निधी
कन्या सुमंगला योजनेची ऑनलाईन नोंदणी
- सर्वप्रथम अर्जदाराला कन्या सुमंगला योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यामध्ये Quick links मध्ये तुम्हाला सिटीझन सर्विस पोर्टल या टॅब वर क्लिक करा.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यावर पुढील एक पेज ओपन होईल.
- आता जे पेज ओपन झाले आहे त्यावर सर्व नियम आणि अटी दिल्या आहेत. खाली तुम्हाला सहमत आहे यावर क्लिक करावे लागेल.
- या पेज वर तुम्हाला नोंदणी अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.आणि त्यानंतर OTP टाकून पडताळणी करून घ्यावी लागेल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. आणि तुम्हाला त्यानंतर लॉगिन आयडी मिळेल. त्याद्वारे तुम्ही MKSY पोर्टल वर लॉगिन करावे लागेलं.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलीचा फॉर्म मिळेल त्या नोंदणी फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या मुली संदर्भात माहिती भरावी लागेल. आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागेल. आणि त्यानंतर submit या टॅब वर क्लिक करावे लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही तुमचा मुलीचा अर्ज भरू शकता.
हे ही वाचा आयुष्मान भारत योजना
कन्या सुमंगल योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :
ज्या लोकांना ऑनलाईन अर्ज करत येत नाही ते ऑफलाईन ही करू शकता. अशा लोकांसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावयाचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
( टीप :खाली फॉर्म डाउनलोड कसा करायचा हे या लेखात सांगितले आहे त्या पद्धतीने ही तुम्ही फॉर्म डाउनलोड करून करून अर्ज करू शकता.)
- अर्जदाराला सुमंगला योजनेचा संदर्भीय कार्यालयात जावे लागेल.
- तिथे जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळवावा लागेल.आणि त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली अचूक भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर ती एकदा परत तपासून बघा सर्व बरोबर आहे आणि त्यांनतर संबंधित कागदपत्रे जोडा.
- ज्या कार्यालयातून फॉर्म मिळवलेला आहे त्याच कार्यालयात फॉर्म सबमिट करा.
- असा प्रकारे तुमची ऑफलाईन ची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
कन्या सुमंगला योजनेचा अर्ज डाउनलोड
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- त्या होमपेज वर quick links मध्ये guidelines scheme या टॅब वर क्लिक करा. किंवा
- new features /reports मध्ये guide smooth operation mukhyamantri kanya sumangala yojana या टॅब वर क्लिक करून फॉर्म मिळवा.
- त्यांनतर तुमचा समोर PDF ओपन होईल. तिथे अर्ज डाउनलोड करा.
- फॉर्म ची प्रिंटाऊट काढून अर्ज करू शकता.
सर्व जिल्ह्याची यादी कशी तपासायची?
महिला आणि बाल विकास विभाग उत्तरप्रदेश यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवार सर्व जिल्ह्याची यादी तपासू शकतो. जिल्हयाची यादी तपासायची प्रक्रिया खालीलप्रमाणे :
- प्रथम उमेदवाराने अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- आता वेबसाईट च्या होमपेज वर New Features किंवा Reports हा पर्याय दिसेल त्या टॅब वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर all district Application List हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे जी काही विचारली आहे ती माहिती भरा.
- आता जिल्हयाची यादी तूमच्या समोर दिसेल.
कन्या सुमंगला योजनेच्या अंमलबजावणी चे टप्पे पुढीलप्रमाणे :
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ६ श्रेणीमध्ये विभागली गेली आहे ती खालीलप्रमाणे,
प्रथम श्रेणी | या श्रेणी अंतर्गत ०१/०४/२०१९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. |
द्वितीय श्रेणी | ज्या मुलींचा जन्म या १ एप्रिल २०१८ पूर्वी झालेला नाही आणि आणि अशा मुलींचा ज्यांनी १ वर्षाच्या आत पूर्ण लसीकरण झाले आहे. |
तिसरा वर्ग | या श्रेणी अंतर्गत चालू शैक्षणिक क्षेत्रात ज्या मुलींची प्रथमी प्रवेश घेतला आहे. |
चौथा वर्ग | ज्या मुलींनी चालू क्षेत्रात सहावीच्या वर्गात भाग घेतला आहे. |
पाचवी श्रेणी | ज्या मुलींनी चालू क्षेत्रात नववीच्या वर्गात भाग घेतला आहे. |
सहावी इयत्ता | या श्रेणी अंतर्गत ज्या मुलींनी चालू शैक्षणिक सत्रात १० वी / १२ वी उत्तीर्ण केली आहे चालू शैक्षणिक क्षेत्रात पदवी किंवा किमान २ वर्षाचा डिम्प्लोमासाठी प्रवेश घेतात आहे. |
या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना २०२२ बद्दल आवश्यक ती सर्व माहिती देण्याचा प्रयन्त केला आहे. तुम्हाला इतर काही माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू विचारू शकता
१) कन्या सुमंगला योजना कधी सुरु केली?
२५ ऑक्टोबर २०१९
२) कन्या सुमंगला योजनेसाठी कोण पात्र आहे?
अजर्दार हा उत्तरप्रदेश चा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक नसावे. आणि कुटूंबात २ पेक्षा जास्त मुली असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
३) कन्या सुमंगला योजनेची सुरवात कोणत्या राज्याने केली?
उत्तरप्रदेश
४) कन्या सुमंगला योजनेचे पैसे कधी मिळणार?
या योजनेचे पैसे ६ टप्प्यात मिळणार आहे. प्रथम श्रेणी मध्ये जेव्हा मुलीचा जन्म होणार दुसऱ्या श्रेणी मध्ये ज्या मुलीचे सर्व लसीकरण झाले आहे तिसऱ्या श्रेणी मध्ये चालू शैक्षणिक क्षेत्रात ज्या मुलींची प्रथम प्रवेश घेतला. चौथा वर्ग सहावीच्या वर्गात गेल्यावर पाचवा वर्ग नववीच्या वर्गात मध्ये गेल्यावर सहावी श्रेणी १० वी / १२ वी उत्तीर्ण केली आहे आणि पदवी किंवा किमान २ वर्षाचा डिम्प्लोमासाठी प्रवेश घेतात आहे. अशा स्वरूपात पैसे मिळणार आहे.
५) कन्या सुमंगला योजना चे स्टेटस कसे तपासायचे?
प्रथम अधिकृत वेबसाईट (MKYS )ला जाऊन भेट द्यावी
नंतर सिटीजन सर्विस पोर्टल वर ला जाऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड ने लॉगिन करायचे.
रिपोर्ट्स मध्ये जाऊन Track Application Status वर क्लिक करा.
आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट करा.
६) युपी मध्ये योगी आदित्यनाथ यांची मुलींसाठी कोणती योजना आहे?
मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना
७) कन्या सुमंगला योजेसाठी लाभार्थी ऑफलाईन अर्ज करू शकता का?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज देखील करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.