Pradhanmantri Suraksha Bima Yojana | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा जाणून घेऊया अधिक माहिती मराठी मध्ये

Pradhanmantri Suraksha Bima Yojana । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ऑनलाईन अर्ज। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभ । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पात्रता । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हेल्पलाईन क्रमांक । Suraksha Bima Yojana In Marathi । PMSBY Certificate Download । PMSBY Online Apply, Age Limit, Benefits, Eligibility, Claim Form, Status, Online Registration, Official Website, Toll free Number । PMSBY । पंतप्रधान सुरक्षा विमा योजना।

Pradhanmantri Suraksha Bima Yojana 2022

Pradhanmantri Suraksha Bima Yojana ही एक विमा योजना आहे. ९ मे २०१५ रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना सुरु केली होती. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला विमा काढणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. खाजगी कंपन्यांनी विमा काढण्यासाठीचे दर जास्त आहे. यामुळे खूप अशा संरक्षण विमा योजना आहे ज्या सरकारद्वारे कमी प्रीमियम द्वारे चालवल्या जातात. त्यातली ही एक विमा योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना .चला तर हा लेख पूर्णपणे वाचा आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अर्ज करण्याच्या संबंधित माहिती जाणून घेऊ याशिवाय तुम्हाला उद्देश, पात्रता, लाभ, महत्वाची कागदपत्रे, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी संबंधित माहिती मिळू शकेल.

सहभागी बँकांमध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व वैयक्तिक बँक खातेधारकांना सामील होण्याचा अधिकार असेल. एखाद्या व्यक्तीची एका किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये एकाधिक बँक खाती असल्यास, ती व्यक्ती केवळ एका बँक खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र असेल. बँक खात्यासाठी आधार हे प्राथमिक केवायसी असेल. Pradhanmantri Suraksha Bima Yojana द्वारे अपघात झाल्यास १लाख-२लाख ची विमा रक्कम दिली जाते. प्रीमियम ची रक्कम दरवर्षी १ जूनपूर्वी किंवा त्यापूर्वी ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे प्रीमियम एका हप्त्यात कापली जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी

हे ही वाचा : प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना 2022

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी :

योजनेचे नाव पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
कोणी सुरवात केलीपीएम नरेंद्र मोदी
कधी सुरु केली९ मे २०१५
अधिकृत संकेस्थळ क्लिक करा
प्रीमियम रक्कम १२ रुपये
पात्रता १८ ते ७० वय असणारे भारतीय नागरिक
मिळणारी विमा रक्कम २ लाख रुपये
लाभार्थी देशातील गरीब लोक
हेल्पलाईन क्रमांक / टोल फ्री क्रमांक १८००११०००१ / १८००१८०११११
Pradhanmantri Suraksha Bima Yojana

PMSBY प्रीमियम :

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रति सदस्य रु. १२/- वार्षिक भरावा लागेल. हा प्रीमियम खातेदाराच्या बँकेच्या बचत खात्यातून १ जून किंवा त्यापूर्वी ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे प्रीमियम एका हप्त्यात कापली जाईल किंवा योजनेअंतर्गत प्रत्येक वार्षिक प्रीमियम हा १ जून नंतर ऑटो डेबिट झाल्यास, कव्हर बँकेद्वारे प्रीमियमच्या ऑटो डेबिटच्या तारखेपासून सुरू होईल.
वार्षिक दाव्यांच्या अनुभवावर आधारित प्रीमियमचे पुनरावलोकन (renew )देखील केले जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश :

देशात प्रत्येक व्यक्तीचा कोणता ना कोणत्या प्रकारचा विमा आहे पण त्याची टक्केवारी हि १०-२० टक्के आहे. देशात अनेक लोक आहे ते आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्यांचा कडे इतके पैसे नाही ते विमा काढू शकतील.आणि अशा वेळी त्यांच्या घरात कोणाचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या काहीही करू शकत नाही आणि त्यांचा घरातला कर्ता पुरुष असेल तर ते काहीच करू शकत नाही. खाजगी विमा काढण्यासाठी त्यांच्याकडे इतके पैसे ही नसतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा काढावा हा या योजनेचा उद्देश आहे त्यामुळे प्रति महिना १ रुपया प्रीमियम वार्षिक १२ रुपये भरून २ लाखाचा लाभ मिळू शकतो. या योजने अंतर्गत जर अपघाती विमा काढला असेल तर त्यांचा कुटुंबाला आणि वारसाला २ लाख रुपये मदत मिळते.

हे ही वाचा : प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2022

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पात्रता :

  • अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीचे वय १८ ते ७० असून त्याचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • बँक किंवा पोस्ट खाते व इन्शुरन्स कंपन्या सर्व वैयक्तिक खातेदारांना सामील होण्याचा अधिकार आहे.
  • बँकांचे वैयक्तिक बँक खातेधारक जे सहभागी होणार त्यांच्या खात्याला ऑटो-डेबिट सक्षम करण्यास संमती देतात, त्यांना या योजनेमध्ये नोंदणी करता येईल..

हे ही वाचा : मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना मराठी

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभ :

Table of Benefits

विमा स्थिती विम्याची रक्कम
मृत्यू २ लाख रुपये
दोन्ही डोळ्यांची पूर्ण हानी आणि बारी न होणारी हानी किंवा दोन्ही
हात किंवा पाय निकामी होणे किंवा एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे
आणि एक हात किंवा पाय निकामी होणे
२ लाख रुपये
एका डोळ्यातील दृष्टी पूर्णपणे गमावणे आणिबारी न होणारी हानी
किंवा एक हात आणि पाय निकामी होणे.
१ लाख रुपये
  • एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तेव्हा त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयाचा विमा मिळेल.
  • या योजनेचा लाभ सर्व स्तरातील लोकांना मिळणार आहे.

हे ही वाचा : प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यादी

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी

सुरक्षा विमा योजनेची कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँक पासबुक
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • ई-मेल आयडी

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

Pradhanmantri Suraksha Bima Yojana । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी
Pradhanmantri Suraksha Bima Yojana । प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी
  • अधिकृत वेबसाइट च्या होमपेज तुमच्या समोर दिसेल. त्या होमपेज वर तुम्हाला फॉर्म हा पर्याय दिसेल.
  • फॉर्म वर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन स्क्रीन उघडेल.
  • आता तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या पर्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला application form वर क्लिक करावे लागेल.
  • आता अर्ज तुमचा समोर pdf मध्ये उघडेल. तुम्ही अर्ज हा pdf मध्ये डाउनलोड करू शकता.
  • यानंतर तुम्ही नाव, पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल आयडी, वारसदाराचे नाव आणि त्यांची जन्मतारीख इत्यादी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून बँकेला अर्ज जमा करावा.

हे ही वाचा : पीएम किसान मानधन योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना कव्हर संपुष्टात आणणे :

  • वयाची ७० वर्षे पूर्ण झाल्यावर ही योजना समाप्त होईल.
  • लाभार्थीचे बचत खाते बंद झाले असेल.
  • विमा चालू ठेवण्यासाठी खात्यात शिल्लक रक्कम नसेल.
  • जर एखाद्या सदस्याने एका पेक्षा जास्त विमा संरक्षण घेतले असेल आणि विमा कंपनीला अनवधानाने प्रीमियम प्राप्त झाला असेल तर, विमा संरक्षण फक्त एका बँक खात्यापुरते मर्यादित असेल आणि डुप्लिकेट विम्यासाठी भरलेला प्रीमियम जप्त केला जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी क्लेम (Claim )कसा करावा ?

तुम्हाला या क्लेम करायचा असेल तर तुम्हाला तुमचे खाते जिथे आहे त्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

  • प्रथम तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अधिकृत संकेस्थळ ला भेट द्यावी.
  • अधिकृत वेबसाइट च्या होमपेज तुमच्या समोर दिसेल. त्या होमपेज वर तुम्हाला फॉर्म हा पर्याय दिसेल.
  • फॉर्म वर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन स्क्रीन उघडेल.
  • आता तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या पर्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला क्लेम फॉर्म वर क्लिक करावे लागेल.
    • अपघाती अपंगत्व आल्यास विमाधारक सदस्याकडून किंवा विमाधारक सदस्याच्या मृत्यूच्या प्रकरणात वारसाकडून वारस अज्ञान असल्यास त्याच्या नियुक्त प्रतिनिधी द्वारे फॉर्म भरण्यात यावा.
      • त्यांचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, अपघाताचा वार, वेळ, तारीख ,अपघाताचे स्थळ, अपघाताचे स्वरूप, मृत्यू तारीख, आधार कार्ड, कायमचे अपंगत्व ठरणाते कागदपत्र, पॅन क्रमांक इत्यादी माहिती
    • विमाधारक सदस्याचा मृत्यू झाल्यास वारसाचा तपशील ( नॉमिनी )
      • वारसाचे नाव, वय, वारस हा अज्ञान असल्यास नियुक्त केलेला प्रतिनिधी ( कुटुंब प्रतिनिधी)
      • वारस नसल्यास किंवा विमाधारकाच्या आधी वारसाचा मृत्यू झाल्यास दावा कर्त्याचे नाव
      • मयत व्यक्तीची वारसाचे आणि दावा कर्त्याचे नाते
      • मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, मृत्यू प्रमाणपत्र
      • दाव्याची रक्कम ज्या खात्यात जमा करायची आहे त्या खात्याचा तपशील इत्यादी
      • आवश्यक ( kyc )कागदपत्रे
  • क्लेम फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे क्लेम फॉर्म सोबत जोडून बँकेला ३० दिवसाच्या आत जमा करावा.
  • नंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस छाननी करेल. विमाधारकाचा दावा हा अपंगत्व मुळे आहे या मृत्यूचा आहे.
  • आणि बँक मृत्यू,अपघाती मृत्यू, अपंगत्व आहे किंवा अजून वेगळी परिस्थिती नुसार कागदपत्रे जमा करायला सांगणार.
  • बँक किंवा ऑफिसला दावा ( क्लेम )मिळाल्यापासून मास्टर पॉलिसी देण्याऱ्या विमा कंपनीकडून दावा प्रक्रिया केली जाते.
  • स्वीकृत दावा रक्कम विमाधारकाच्या किंवा दावाकर्त्याच्या, जसे प्रकरण असेल तसे, बँकेच्या / पोस्ट ऑफिसच्या खात्यात पाठविली जाईल .

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हेल्पलाईन क्रमांक :

S.No.राज्य बँक टोल फ्री क्रमांक
1आंध्रप्रदेश आंध्र बँक १८००-४२५-८५२५
2अंदमान आणि निकोबार एस बी आय १८००-३४५-४५४५
3अरुणाचल एस बी आय १८००-३४५-३६१६
4आसाम एस बी आय १८००-३४५-३७५६
5बिहार एस बी आय १८००-३४५-६१९५
6चंदिगढ पंजाब नॅशनल बँक १८००-१८०-११११
7छत्तीसगढ एस बी आय १८००-२३३-४३५८
8दादर आणि नगर हवेली देना बँक १८००-२२५-८८५
9दमन आणि दीव देना बँक १८००-२२५-८८५
10दिल्ली ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स १८००-१८००-१२४
11गोवा एस बी आय १८००-२३३३-२०२
12गुजरात देना बँक १८००-२२५-८८५
13हरियाणा पंजाब नॅशनल बँक १८००-१८०-११११
14हिमाचलप्रदेश युको बँक १८००-180-8053
15झारखंड बँक ऑफ इंडिया १८००-३४५-6576
16कर्नाटक सिडीकेट बँक १८००-४२५९-७७७७
17केरळ कॅनरा बँक१८००-४३५-११२२२
18लक्षद्वीप सिडिकेट बँक१८००-४२५९-७७७७
19मध्यप्रदेश सेंट्रल बँक ऑफ इंडिया१८००-२३३-४०३५
20महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र १८००-१०२-२६३६
21मणिपूर एस बी आय १८००-३४५-3858
22मेघालय एस बी आय १८००- ३४५- 3658
23मिझोरम एस बी आय १८००-३४५-३६६०
24नागालँड एस बी आय १८००-३४५-३७०८
25ओडिसा युको बँक १८००-३४५-६५५१
26पॉंडिचेरी इंडियन बँक १८००-४२५०-००००
27पंजाब पंजाब नॅशनल बँक १८००-१८०-११११
28राजस्थान बँक ऑफ बरोदा १८००-१८०-६५४६
29सिक्कीम एस बी आय १८००-३४५-३२५६
30तेलंगणा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद १८००-४२५-८९३३
31तामिळनाडू इंडियन ओव्हरसीज बँक १८००-४२५-४४१५
  32उत्तरप्रदेश बँक ऑफ बरोदा १८००-१०२-४४५५
33उत्तराखंड एस बी आय १८००-१८०-४१६७
34पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा युनाइटेड बँक ऑफ इंडिया १८००-३४५-३३४३

हे ही वाचा : पीएम सम्मान निधी योजना २०२२ लाभार्थी स्थिती

महत्वाची लिंक्स :

१) प्रीमियम कसा भरला जाईल?

खातेदाराच्या बँक खात्यातून ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे प्रीमियम एका हप्त्यात कापला जाईल, नावनोंदणीवर दिलेल्या संमतीनुसार. योजना लागू होईपर्यंत सदस्य दरवर्षी स्वयं-डेबिटसाठी एक-वेळ आदेश देऊ शकतात, रिनिव अधीन जे योजनेच्या अनुभवाच्या पुनरावलोकनावर आवश्यक मानले जाऊ शकते.

२) कोण सदस्यता घेण्यास पात्र असेल?

१८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व वैयक्तिक (एकल किंवा संयुक्त) बँक खातेधारकांना सामील होण्याचा अधिकार असेल. एखाद्या व्यक्तीची एका किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये एकाधिक बँक खाती असल्यास, ती व्यक्ती केवळ एका बँक खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र असेल.

३) अपघात संरक्षण आश्वासन कधी संपुष्टात येऊ शकते?

या लेखात सविस्तर माहिती दिलेली आहे. विमा ही कशी समाप्त होते.

४)हे कव्हर इतर कोणत्याही विमा योजनेच्या कव्हरच्या व्यतिरिक्त असेल का ज्यामध्ये ग्राहक कव्हर करू शकतात?

होय.

५) अपघातानंतर मृत्यू किंवा अपंगत्व आल्यावर हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची परतफेड करण्याची काही तरतूद आहे का?

नाही

६) खातेदाराने आत्महत्या केल्यास कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल का?

नाही

3 thoughts on “Pradhanmantri Suraksha Bima Yojana | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा जाणून घेऊया अधिक माहिती मराठी मध्ये”

Leave a Comment