PM Suryodaya Yojana 2024 Apply Online |प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?

PM Suryodaya Yojana| Pradhanmantri Suryoday Yojana 2024 in Marathi।PM Surya Ghar Yojana| पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट, पीएम सूर्योदय योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये, प्रधानमंत्री सूर्योदय योजना पात्रता, कागदपत्रे, प्रधानमंत्री सूर्योदय योजना हेल्पलाइन क्रमांक,

PM Suryodaya Yojana 2024 ( PM Surya Ghar)

मुफ्त बिजली योजना ही एक सरकारी योजना आहे ज्याचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. योजनेअंतर्गत, कुटुंबांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल. या योजनेत अधिकाधिक लोकांनी नोंदणी करावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही मदतीसाठी, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मदत घेऊ शकता. या योजनेसाठी कसा अर्ज करायचा? या योजनेचे फायदे, पात्रता जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

देशातील जे नागरिक वाढत्या वीजबिलांच्या समस्येशी झगडत होते, त्यांना आता या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता घरांमध्ये सोलर पॅनल बसवल्यास त्यांचे वीज बिल कमी होईल आणि सरकार सौर पॅनेल बसविण्यावर सबसिडीही देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करून या योजनेची माहिती दिली आहे.

PM surya ghar yojana

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट

पीएम सूर्योदय योजनेचा उद्देश देशातील नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून वीज बिल कमी करणे हा आहे. वाढत्या विजेच्या दरामुळे जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार सूर्योदय योजनेच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढेल. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे

सूर्योदय योजनेमुळे सोलर पॅनल बसविल्यास नागरिकांना त्यांच्या वीज बिलाचा खर्च कमी होऊ शकतो.
या योजनेच्या माध्यमातून गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.
सोलर पॅनलसाठी सरकारकडून सबसिडीही दिली जाणार आहे.
पीएम सूर्योदय योजना 2024 द्वारे, सरकार आपले उर्जा संवर्धनाचे उद्दिष्ट देखील साध्य करू शकते.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना पात्रता

  • पीएम सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे
  • ही योजना फक्त गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती गरिबीत असली पाहिजे.
  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने नमूद केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत सौर पॅनेलसाठी आरक्षित वर्गवारीनुसार अनुदान दिले जाईल.
  • कुटुंबाने सौर पॅनेलसाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 साठी कागदपत्रे
पीएम सूर्योदय योजना 2024 साठी पात्र होण्यासाठी, लाभार्थ्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्याची यादी खाली दिली आहे- लाभार्थीचे आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
लाभार्थीचे उत्पन्न प्रमाणपत्र
लाभार्थीचे नाव वीज बिल
फोन नंबर
बँक पासबुक
लाभार्थीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशन कार्ड किंवा बीपीएल कार्ड

प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत अर्ज कसा करावा ?

  • सरकारने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर ‘Apply for Rooftop Solar’ वर जा.
  • नोंदणीसाठी, तुमचे राज्य, जिल्हा आणि तुमच्या क्षेत्रातील वीज वितरण कंपनी निवडा.
PM Suryodaya Yojana
  • आता तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
  • त्यानंतर पुढील चरणात तुम्ही ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
PM Suryodaya Yojana
  • आता तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. एकदा तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यावर, तुमच्या DISCOM मधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करा.
  • इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
  • नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, तुम्ही पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करू शकाल.
  • आता कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
  • आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल

प्रधानमंत्री सूर्योदय योजना अनुदान व खर्च
घराच्या छतावर विविध क्षमतेच्या पॅनल आणि बॅटरी बसविण्यात येतात. त्यापैकी तुम्ही योजनेअंतगर्त तुमच्या छतावर किती क्षमतेचे पॅनल आणि बॅटरी सेटअप करता यावर तुमचा एकूण खर्च अवलंबून असतो. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत सोलर पॅनल सेटअपसाठी 40 % सब्सिडी देण्याचा निर्णय केला आहे

त्यांना शासनाकडून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. एक किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यावर 30,000 रुपये, दोन किलोवॅट सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्याचा पेक्षा जास्त किलोवॅट सौर पॅनेलच्या स्थापनेवर 78,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे 3 किलोवॅट क्षमतेचा सेट अप लावण्यासाठी अंदाजे 1 लाख रुपये ते 1.25 लाख एवढा खर्च येतो. तसेच 5 किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 2.50 लाख ते 3 लाख रुपये एवढा खर्च येतो. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत सोलर पॅनल सेटअपसाठी 40 % सब्सिडी देण्याचा निर्णय केला आहे

प्रधानमंत्री सूर्योदय योजना हेल्पलाइन क्रमांक EMAIL – rts-support@gov.in

हे ही वाचा

काय आहे प्रधानमंत्री मातृत्व वदना योजना  माझी कन्या भाग्यश्री योजना मोफत शिलाई मशीन योजना 2024 मिळवण्यासाठी त्वरीत फॉर्म भरा.

वारंवार विचारलेलं जाणारे प्रश्ने ( FAQ )

1 प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ हा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मिळणार आहे. जे आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा वीजबिलासाठी खर्च करतात, त्यांना वाढत्या वीज बिलातून दिलासा मिळण्यासाठी हि महत्वपूर्ण योजना आहे

2 पंतप्रधान सूर्योदय योजनेमध्ये अनुदान किती असेल ?

लोकांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. त्यांना शासनाकडून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. एक किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यावर 30,000 रुपये, दोन किलोवॅट सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट सौर पॅनेलच्या स्थापनेवर 78,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

3 पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करण्याचा उद्देश काय आहे ?​

या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब कुटुंबांच्या छतावर सौर पॅनेल बसवून त्यांचा वीज खर्च कमी करणे हा आहे. यासाठी सरकार एक कोटी नागरिकांना अनुदानही देणार आहे. वाढत्या वीज बिलांमुळे त्रासलेल्या देशातील नागरिकांना आता पीएम सूर्योदय योजनेतून मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment