पीएम किसान योजना | पीएम किसान सन्मान निधी योजनेचे फायदे | किसान सन्मान निधीची लाभार्थी यादीकशी तपासायची ?। pm kisan yojana । pm kisan beneficiary list । pm kisan beneficiary status । pm kisan samman nidhi 17th installment in 2024। पीएम किसान योजना मराठी
पीएम किसान योजना 2024
शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 16 हप्ते वितरित केले गेले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत 32 हजार रुपये केंद्र शासनाद्वारे दिलेली आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत 6000 हजार रुपये दिले जातात आणि दर चार महिन्याला 2000 हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिल्या जातात.
पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यमध्ये 6000 हजार रुपये हस्तांतरित केला. आता शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.तर मित्रांनो आतापर्यंत केंद्र शासनाने याबाबत काहीच अधिकृत माहिती दिली नाही.
पीएम किसान सन्मान निधी 2024 अंतर्गत नवीन नियम आहेत ते बघूया. आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा. तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा.
बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक आहे.
केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे.
भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे पैसे कोणाला मिळणार नाहीत?
- PM किसान 17 व्या हप्ता योजनेचा लाभ फक्त भारतीय शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
- पात्र शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे.
- पात्र शेतकऱ्याचे बँक किंवा किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे अधिकृत खाते असणे आवश्यक आहे.
- शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न काही निकषांनुसार ठरवले जाते.
- वेगवेगळ्या राज्यांचे उत्पन्न ठरवण्यासाठी वेगवेगळे निकष असू शकतात.
- या निकषांच्या आधारे योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.
- एखाद्या शेतकऱ्याकडे वरीलपैकी कोणतेही निकष नसल्यास.
- त्यामुळे तो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही.
कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही?
- शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती कर भरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा फायदा मिळत नाही.
- ज्यांच्याकडे स्वत:च्या नावावर शेतजमीन नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- शेतजमीन असूनही ती वडील किंवा आजोबांच्या नावे अथवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे असेल तरी या जमीनीवर राबणाऱ्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शेतजमीन नावावर असूनही एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर तिला या योजनेचे लाभ मिळत नाही.
- नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्डट अकाऊटंट यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- एखाद्या शेतकऱ्याला वर्षाला दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधीची लाभार्थी यादी तपासा.
- सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर भेट द्या.
- त्या होमी पेज च्या उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
- त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.
- आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर (Beneficiary Status) क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाइल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.
- वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला तुमचे नाव मिळेल.
मोबाईल ऐप द्वारे किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी तपासायची?
- सर्वप्रथम लाभार्थ्याने त्याच्या अँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरवर जावे लागेल.
- प्ले स्टोअरवर गेल्यानंतर, तुम्हाला सर्च बारमध्ये PMKISAN GoI अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल .
- ऐप डाउनलोड केल्यानंतर, ते ऐप उघडा. ओपन बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
- तुम्हाला ऐप वर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा दिसतील. जसे की लाभार्थी स्थिती तपासा , आधार तपशील संपादित करा, स्वत: नोंदणीकृत शेतकरी स्थिती, नवीन शेतकरी नोंदणी, योजनेबद्दल, पीएम-किसान हेल्पलाइन इ.
- आपण यापैकी कोणत्याही बद्दल माहिती मिळवू शकता.
मोबाईल नंबर द्वारे पीएम किसान स्थिती 2024
- प्रथम तुम्हीpm kisan च्या वेबसाइट ला भेट द्या.
आता Farmers Corner वर लाभार्थी स्थिती ( Beneficiary Status )पर्यायावर क्लिक करा. - आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाका.आता तुम्हाला मिळालेला OTP टाका.
यानंतर कॅप्टचा कोड टाका. यानंतर तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती आता स्क्रिनवर मिळेल - पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा.
पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ?
ई-केवायसी च्या तीन पद्धती आहेत त्या बघूया. 1) OTP आधारित ई-केवायसी. 2) बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी 3) फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी
OTP आधारित ई-केवायसी.
- पीएम किसान वेबसाइटवर जा (https://pmkisan.gov.in/) आणि “e-KYC” लिंकवर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड एंटर करा.
- ओटीपी (वन टाइम पासवर्ड) तयार करण्यासाठी “सबमिट” वर क्लिक करा जो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.
- ई-केवायसी फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी OTP प्रविष्ट करा आणि “सबमिट” वर क्लिक करा.
- तुमचे नाव, पत्ता आणि बँक खाते तपशीलांसह आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
- तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ती बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही दिलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा.
- ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फॉर्म सबमिट करा.
बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी
- तुमचे आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरसह तुमच्या जवळच्या सामायिक सुविधा केंद्र (CSC) राज्य सेवा केंद्रांना (SSK)ला भेट द्या.
- सामायिक सुविधा केंद्र (CSC) राज्य सेवा केंद्र (SSK) मधील ऑपरेटर आधार आधारित पडताळणी वापरून प्रमाणित करण्यात शेतकऱ्याला मदत करेल.
फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी
- Google Play Store वरून PM-Kisan Mobile App आणि Adhaar Face ID App डाउनलोड करा.
- अँप उघडा आणि पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल नंबर द्वारे लॉगिन इन करा . Beneficiary Status page वर जा.
- ई-केवायसी स्थितीनाही असल्यास EKYC या बटन वर क्लिक करा, नंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या.
- तुमचा चेहरा स्कॅन यशस्वीरीत्या केल्यावर ई-केवासी पूर्ण होते.
पीएम शेतकरी संबंधित समस्यांसाठी येथे संपर्क साधा
तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता. याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल. pmkisan-ict@gov.in वर मेल करूनही शेतकरी त्यांच्या समस्येचे निराकरण करू शकता.
अधिक माहितीसाठी :