Pradhanmantri Jan Dhan Yojana Online Apply 2022 | PMJDY

Pradhanmantri Jan Dhan Yojana | PM Jan Dhan Yojana | Pradhanmantri Jan Dhan Yojana online apply | jan dhan yojana account opening | Pradhanmantri Jan Dhan Yojana In Marathi ।Pradhanmantri Jan Dhan Yojana Online Apply | Jan Dhan Yojana Account | pradhanmantri jan dhan yojana benefits | Pradhanmantri Jan Dhan Yojana In Marathi | प्रधानमंत्री जन धन योजना । जन धन योजना ।

Pradhanmantri Jan Dhan Yojana 2022

देशातील गरीब आणि प्रत्येक नागरिकाला किमान एक बँक खाते असावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाचे बँक, पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँक मध्ये झिरो बँलन्स चे खाते उघडले गेले. बँकिंग सुविधा आणि सरकारी योजनेचा आर्थिक लाभ व्हावा आणि तसेच व्यवहार सरळ होण्यासाठी Pradhanmantri Jan Dhan Yojana In Marathi सुरु करण्यात आली . माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १५ऑगस्ट २०१४ रोजी “प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)” ची घोषणा केली आणि २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत १००००रुपये च्या ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा आणि रुपे डेबिट कार्ड पीएमजेडीवाय खातेधारकाला प्रदान केले गेले. तसेच RuPay कार्डवर रु. १ लाख (२८.०८.२०१८ नंतर उघडलेल्या नवीन PMJDY खात्यांसाठी रु. २ लाख पर्यंत वाढवलेले) अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे.


प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हे आर्थिक सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक समावेशासाठी राष्ट्रीय मिशन आहे, म्हणजे मूलभूत बचत आणि ठेव खाती, प्रेषण, क्रेडिट, विमा, पेन्शन परवडणाऱ्या पद्धतीने. योजनेंतर्गत, इतर कोणतेही खाते नसलेल्या व्यक्तींद्वारे कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये मूलभूत बचत बँक ठेव खाते उघडले जाऊ शकते.

Pradhanmantri Jan Dhan Yojana लाभ म्हणजे ज्यांचे बचत खाते आहे ते जन धन मध्ये रूपांतरित करण्यासाठी बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. आणि Rupay card साठी अर्ज करावा लागेल. दोन्हीही फॉर्म भरून बँक अधिकाऱ्याकडे जमा करावे.दोन्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर बचत खात जन धन खात्यात बदलले जाते . चला तर हा लेख पूर्णपणे वाचा आणि जन धन योजना संबंधित माहिती जाणून घेऊ याशिवाय तुम्हाला उद्देश, पात्रता, लाभ, महत्वाची कागदपत्रे, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी संबंधित माहिती मिळू शकेल.

प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हे वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय मिशन आहे, म्हणजे बँकिंग/बचत आणि ठेव खाती, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेंशन परवडणाऱ्या पद्धतीने.

जन धन योजना ठळक मुद्दे

योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना
सुरवात कोणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरु झाली२८ ऑगस्ट २०१४
लाभार्थी देशातील नागरिक
अधिकृत संकेस्थळ pmjdy.gov.in

जन धन योजनेचे फायदे / लाभ:

प्रधानमंत्री जन-धन योजनेचे वैशिष्ट्ये:

  • या योजनेमुळे लाभार्थी चे बचत खाते उघडले जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थीला किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थीला डेबिट कार्ड दिले जाते .
  • जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यावर बँकेकडून व्याज दिले जाते.
  • PMJDY अंतर्गत अपघाती २ लाख रुपये संरक्षण विमा दिला जातो. तसेच ३०००० रुपये जीवन विमा संरक्षण दिले जाते.

हे ही वाचा: काय आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महिलांना मिळतात ६००० रुपये

प्रधानमंत्री जन धन योजनेचे पात्रता:

  • १० वर्ष पर्यंतचे मुल ही या योजनेअंतर्गत खाते उघडू शकते पण १० वर्षाच्या आत नाही.
  • केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • निवृत्त केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • आयकर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

प्रधानमंत्री जन धन योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे:

  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • पत्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम जन धन योजना २०२२ मध्ये अर्ज कसा करायचा?

  • बँकेत जाऊन तुम्ही बँक प्रतिनिधी ला सांगितले जन धन योजनेअंतर्गत खाते उघडायचे आहे .तर बँक प्रतिनिधी तुम्हाला अर्ज देईल.
  • अर्ज भरल्यावर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडवी लागेल.
  • आणि तो अर्ज बँक प्रतिनिधी कडे जमा करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जन धन खाते उघडू शकता.

हे ही वाचा: पीएम किसान योजना रजिस्ट्रेशन

जन धन योजना फॉर्म डाउनलोड करण्याची पद्धत :

  • प्रथम तुम्हाला पीएम जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
  • आता तुमच्या समोर होमपेज उघडेल. आता होमपेज वर तुम्हाला e-documents या विभागात तुम्हाला अकाउंट ओपनिंग फॉर्म हिंदी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे.
  • तुम्हाला ज्या भाषेत फॉर्म हवा त्यावर क्लिक करून तो फॉर्म उघडेल . आणि त्यांनतर तो फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.

पीएम जन धन खात्यातील बँक शिल्लक रक्कम कशी तपासायची?

जन धन खात्यातील बँक शिल्लक रक्कम दोन प्रकारे बघू शकतो

  1. पोर्टलद्वारे
  2. मिस कॉल द्वारे

पोर्टलद्वारे

  • प्रथम तुम्हाला PMFS अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर होमपेज ओपन होईल.
  • होमपेज वर तुम्हाला डाव्या बाजूला Know Your Payment New या टॅब वर क्लिक करा.
  • या पेज वर तुम्हाला तुमचे बँकेचे नाव, खाते क्रमांक हा दोनदा टाकावा लागेल आणि कॅप्टचा कोड टाकावा लागेल.
  • आणि आता तुम्हाला Send OTP on Registerd Mobile Number या टॅब वर क्लिक करा आता तुमचा नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर वर OTP येईल.त्यानंतर OTP टाकून तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता.

मिस कॉल द्वारे:

  • जर तुम्हाला पोर्टलवर बँक बॅलन्स चेक करायचा किंवा तुम्हाला माहित नसेल कसे चेक करायचे तर तुही मिस कॉल द्वारे चेक करू शकता .
  • तुमचा मोबाईल नंबर हा खात्याला ragisterd पाहिजे. आणि तुम्हाला त्याच मोबाइल नंबर वरून कॉल दयायला पाहिजे जो नोंदणीकृत आहे.
    • आयसीआयसी आई बँक ( ICICI Bank ) – 95946125612
    • एक्सिस बॅंक (Axis Bank ) – 18004195959
    • स्टेट बैंक ऑफ इंडिया ( SBI ) – 18001802223
    • पंजाब नॅशनल बँक (PNB ) – 18001802223
  • मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता

हे ही वाचा: रजिस्ट्रेशन प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना 2022

Bank लॉगिन प्रकिया:

  • प्रथम तुम्हाला पंतप्रधान जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • तुमचा समोर होमपेज ओपन होईल. होमपेज वर Write to us या टॅब वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला Bank Login या टॅब वर क्लिक करावे लागेल.

सरकारने खालील नियम आर्थिक समावेशासाठी राष्ट्रीय मिशन- PMJDY सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे:
(a) वित्तीय समावेशासाठी राष्ट्रीय मिशन (PMJDY) १४.०८.२०१८ नंतर सुरू ठेवणे
(b) ५,००० रुपयांची विद्यमान ओडी मर्यादा १०,०००रुपये करण्यात येईल
(c) २,००० रुपयांपर्यंतच्या OD साठी कोणत्याही अटी जोडल्या जाणार नाहीत.
(d) OD सुविधेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा १८-६० वर्षांवरून १८-६५ वर्षे सुधारली जाईल.
(e) विस्तारित कव्हरेज अंतर्गत “प्रत्येक घरापासून प्रत्येक प्रौढापर्यंत”, नवीन RuPay कार्डधारकांसाठी अपघाती विमा संरक्षण २८.०८.२०१८नंतर उघडलेल्या नवीन PMJDY खात्यांसाठी १ लाख रुपये वरून २ लाख रुपये केले जाईल.

SLBC साठी DFS च्या Nodal Officer ची यादी:

  • प्रथम तुम्हाला पंतप्रधान जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
pradhanmantri jan dhan yojana
Pradhanmantri Jan Dhan Yojana
  • आता तुमचा समोर होमपेज उघडेल.
  • यानंतर तुम्हाला होमपेज वर quick links मध्ये List of Nodal Officers of DFS for SLBC या टॅब क्लिक करावे.
  • आता तुमच्या समोर नवीन पेज दिसेल
Pradhanmantri Jan Dhan Yojana
List of Nodal Officers of DFS for SLBC

हे ही वाचा: E-Shram Card Registration Online

SLBC लॉगिन प्रक्रिया:

  • प्रथम तुम्हाला पंतप्रधान जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • तुमचा समोर होमपेज ओपन होईल. होमपेज वर Write to us या टॅब वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला SLBC Login या टॅब वर क्लिक करावे लागेल.

संपर्क यादी डाउनलोड पद्धत :

हे ही वाचा: मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना मराठी

पीएमजेडीवाय मिशन कार्यालयाचा पत्ता:
प्रधानमंत्री जन धन योजना, वित्तीय सेवा विभाग,अर्थमंत्रालय, खोली क्रमांक १०६,दुसरा मजला, जीवनदीप बिल्डिंग, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१ ईमेल: missionfi@nic.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१) प्रधानमंत्री जन-धन योजनेत संयुक्त खाते उघडता येईल का?

होय

२) PMJDY अंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल का?

नाही.

३) रुपे डेबिट कार्ड म्हणजे काय?

रुपे डेबिट कार्ड हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे सादर केलेले देशांतर्गत डेबिट कार्ड आहे. हे कार्ड देशातील सर्व ATM आणि PoS मशीनवर (खरेदीसाठी कॅशलेस पेमेंट करण्यासाठी) स्वीकारले जाते.

1 thought on “Pradhanmantri Jan Dhan Yojana Online Apply 2022 | PMJDY”

Leave a Comment