प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना-2022। Sukanya Samriddhi Yojana in Marathi

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Yojana in Marathi | SSY Scheme | सुकन्या समृद्धी योजनेची उद्दिष्टे, व्याजदर 2022 | सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस | सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आणि तोटे | Sukanya Samriddhi Yojana Calculator।सुकन्या समृद्धी योजनेसाठी अधिकृत बँका | सुकन्या योजना । Sukanya yojna details | Sukanya yojana details in marathi | Sukanya samriddhi yojana information in marathi | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra ।

महत्वाची सूचना : आम्ही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचावा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबे असतील जे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील

सुकन्या समृद्धी योजना 2022

सुकन्या समृद्धी योजना marathi ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. ही भारत सरकारची एक अल्प बचत योजना आहे जी केवळ मुलींसाठी आहे. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही सर्वोत्तम योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्याने तुम्हाला आयकर वाचविण्यासही मदत होते. पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत व्यावसायिक बँकांमध्ये मुलीच्या नावाने (जे निवासी भारतीय नागरिक आहे) फक्त एकच खाते उघडले जाऊ शकते. या नियमांखालील खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी सामान्य परिस्थितीत उघडले जाईल.

ही योजना लहान गुतंवणूक योजनेच्या श्रेणीत येते. तिचा मुख्य उद्देश मुलींच्या भविष्यासाठी पालकांनी केलेली बचत आहे. ज्यांना आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या शिक्षणासाठी किमान २५० रुपये ठेव रकमेसह सुरवात करू शकता.यापूर्वी ही रक्कम १ हजार रुपये होती. चालू आर्थिक वर्षात या योजने अंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील.

हे ही वाचा : फ्री शिलाई मशीन योजना

या योजने अंतर्गत खाते उघडल्यानंतर मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत किंवा १८ वर्ष नंतर लग्न होईपर्यंत ते चालवले जाऊ शकते या योजनेच्या नवीन नियमानुसार केवळ मूळ भारतातील रहिवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर अशी मुलगी ही सुकन्या समृद्धी योजना पूर्ण होण्यापूर्वी भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू लागली तर अशा परिस्थितीत ती मुलगी या योजनेपासून वंचित राहणार. या योजनेच्या नवीन नियमानुसार महिनाभरात मुलीची निवासी स्थान बदले तर पालकांना माहिती द्यावी लागते.

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना मराठी

पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत व्यावसायिक बँकांमध्ये मुलीच्या नावाने (जे निवासी भारतीय नागरिक आहे) फक्त एकच खाते उघडले जाऊ शकते. या नियमांखालील खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी सामान्य परिस्थितीत उघडले जाईल.

 • ० ते १० वयोगटातील अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकाद्वारे अनियमित खाते प्रति वर्ष किमान निर्दिष्ट रकमेसह प्रति वर्ष ५० रुपये दंड भरून नियमित केले जाऊ शकते. खाते उघडले जाऊ शकते.
 • ज्या मुलीच्या नावाने खाते उघडले आहे त्या मुलीचा जन्म दाखला घेणे आवश्यक आहे.
 • किमान योगदान रु.२५०/- आणि कमाल योगदान रु.१५००००/- वार्षिक आहे.
 • १.५ लाख आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत आयकर कपातीसाठी पात्र आहेत. सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम आणि मिळणारे व्याज करपात्र नाही.
 • खाते उघडल्याच्या तारखेपासून पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत खात्यात ठेवी ठेवल्या जाऊ शकतात.
 • खाते उघडल्याच्या तारखेपासून २१(एकवीस) वर्षे पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल.
 • दराने व्याज,७.६% (भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार दिनांक ३०/१२/२०२१)
 • अनियमित खाते प्रति वर्ष किमान रकमेसह प्रति वर्ष ५० रुपये दंड भरून नियमित केले जाऊ शकते.

हे ही वाचा: अग्निपथ योजना २०२२

सुकन्या समृद्धी योजना फॉर्म (SSY)

योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना
खाते प्रकार अल्प बचत योजना
योजनेची सुरवात २२ जानेवारी २०१५
खाते उघडण्याचे वय० ते १० वर्षे
खात्यात जमा करण्यासाठी रक्कम किमान २५०रु.जास्तीस्त जास्त १.५ लाख ( एका वर्षात )
व्याज दर ७.६%
हे खाते कोण उघडू शकते मुलीचे पालक
खाते परिपक्वता २१ वर्षे
किती खाती उघडू शकतातजेव्हा मुलगी १८ वर्षांची होईल, काही अटींच्या अधीन
किती खाती उघडू शकतातजास्तीत जास्त दोन मुली (दोन मुली जुळे असताना तीन खाती)
सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या योजना नवीन अपडेट:

आधी एका परिवारातील फक्त २ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील ३ मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

सुकन्या समृद्धी योजना हि एक लहान बचत योजना आहे. जी २२ जानेवारी २०१५ रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरु केली या योजनेअंतर्गत मुलींची बचत खाती उघडली जाते.ज्यामध्ये २५० ते १.५० लाख रुपयांची रक्कम जमा करता येते.

हे ही वाचा पीएम किसान सम्मान निधी योजना २०२२

सुकन्या समृद्धी योजनांचे उद्दिष्ट्ये : Sukanya Samriddhi Yojana Objectives

 • केंद्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट्य देशातील मुलींचे उज्वल भविष्य करणे आहे.
 • मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
 • मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणि भविष्यात सन्मानाने जगता या या योजनेची सुरुवात करण्यात आली.
 • भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना व्याज दर (Sukanya Samriddhi Yojana Intrest Rate 2022 )

कालावधी व्याजदर RATE (%)
३ डिसेंबर २०१४ पासून ९.१ %
१ एप्रिल २०१५ पासून ९.२%
१ एप्रिल २०१६ पासून ८.६%
१ ऑक्टोबर २०१६ पासून ८.५%
१ एप्रिल २०१७ पासून८.४%
१ जून २०१७ पासून ८.३%
१ जानेवारी २०१८ पासून ८.१%
१ ऑक्टोबर २०१८ पासून ८.५%
१ जुलै २०१९ पासून ८.४%
१ एप्रिल २०२० पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत७.६%

सुकन्या समृद्धि योजना पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना कशी उघडायची?

 • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • सुकन्या योजनेसाठी सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.
 • अर्जासोबत सहाय्यक कागदपत्रे आणि पुरावे जोडा.
 • पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
 • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.
 • प्रारंभिक ठेव रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट म्हणून भरा.
 • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून तुमचे SSY खाते उघडल्यानंतर एक पासबुक जारी केले जाईल.
 • अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

हे ही वाचा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

सुकन्या समृद्धी योजना कशी पोस्ट ऑफिस ते बँक मध्ये हस्तांतरित करावी?
SSY खाते पोस्ट ऑफिस मधून बँकेत हस्तांतरित करण्यासाठी, खालील प्रमाणे सूचनांचे अनुसरण करा

 • खाते असलेल्या पोस्ट ऑफिस शाखेला भेट द्या. मुलीला पोस्ट ऑफिस ला भेट देण्याची गरज नाही कारण पालक प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
 • SSY खाते हस्तांतरित करण्याच्या तुमच्या हेतूबद्दल पोस्ट ऑफिस च्या अधिकाऱ्याला कळवा.
 • योग्यरित्या भरलेला खाते हस्तांतरण फॉर्म, पासबुक आणि केवायसी कागदपत्रे सबमिट करा. तुमच्या विनंतीवरून कार्यकारी खाते बंद करेल.
 • आता, ज्या बँकेच्या शाखेत तुम्हाला SSY खाते ठेवायचे आहे त्या शाखेला भेट द्या.
 • पोस्ट ऑफिस च्या अधिकाऱ्याने तुम्हाला दिलेली KYC कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे त्यांच्याकडे खाते चालू ठेवण्याची विनंती करताना सबमिट करा.
 • एकदा बँक कार्यकारी तुमच्या विनंतीवर प्रक्रिया केल्यानंतर, एक नवीन पासबुक तुम्हाला दिले जाईल.

सुकन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे/ पात्रता

 • या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी वय १० वर्षापेक्षा कमी असावे.
 • अर्ज
 • आधार कार्ड
 • मुलीचा जन्म दाखला
 • फोटोग्राफ ( मुलीचा आणि पालकांचा फोटो )
 • पालकाची ओळख आणि पत्ता पुरावा
 • जन्माच्या एकाच क्रमाने अनेक मुलींच्या जन्माच्या बाबतीत, त्याच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
 • पोस्ट ऑफिस किंवा बँकांना आवश्यक असलेली इतर कागदपत्रे

हे ही वाचा आयुष्मान भारत योजना २०२२

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे : Suknaya Samriddhi Yojana Benefits

 • आयकर कायद्या १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत आयकर कपातीसाठी पात्र आहेत. सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम आणि मिळणारे व्याज करपात्र नाही.
 • इतर मुदत ठेव योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो.
 • सुकन्या योजनेत कमीत कमी २५० रुपये ते १.५ लाख रुपये वार्षिक ठेव म्हणून ठेऊ शकतो.
 • सुकन्या योजना कोणत्याही बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सहज सुरु करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे नुकसान/ तोटे : Sukanya Samriddhi Yojana Disadvantages

 • सुकन्या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे २१ वर्षाचा असतो.
 • या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक १.५ लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही
 • या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर ७.६ टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या २१ वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.

सुकन्या समृद्धी साठी अर्ज कसा करावा?

 • ज्यांना सुकन्या योजनेअंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी प्रथम सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
 • यानंतर आवश्यक ती माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म बरोबर आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागेल.
 • आता यानंतर ज्या बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे तिथे जाऊन फॉर्म, कागदपत्रे, आणि रकमेसह जमा करावी.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अधिकृत बँका

 • अलाहाबाद बँक
 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • अॅक्सिस बँक
 • आंध्र बँक
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • बँक ऑफ इंडिया
 • कॉर्पोरेशन बँक
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 • कॅनरा बँक
 • देना बँक
 • बँक ऑफ बडॊदा
 • स्टेट बँक ऑफ पटियाला
 • स्टेट बँक ऑफ म्हैसूर
 • इंडियन ओव्हरसीज बँक
 • इंडियन बँक
 • पंजाब नॅशनल बँक
 • आय डी बी आय बँक
 • आयसीआयसीआय बँक
 • सिंडिकेट बँक
 • स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर
 • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
 • ओरिएटल बँक ऑफ कॉमर्स
 • स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
 • पंजाब आणि सिंध बँक
 • युनियन बँक ऑफ इंडिया
 • युको बँक
 • युनाटेड बँक ऑफ इंडिया
 • विजया बँक

सुकन्या योजना कैलकुलेटर ।Sukanya Samriddhi Yojana Calculator :

SSY खात्याचे व्याज कॅलेंडर महिन्यासाठी सर्वात कमी शिल्लक रकमेवर मोजले जाते, म्हणजे महिन्याच्या पाचव्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटी. व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी एकदाच जमा केले जाते.

SSY खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची गणना करण्यासाठी तुम्ही खालील सूत्र वापरू शकता
A = P(1+r/n)^nt
येथे
P = प्रारंभिक ठेव
r = व्याजदर
n = व्याज संयुगे वर्षांची संख्या
t = वर्षांची संख्या
A = परिपक्वतेच्या वेळी रक्कम

SSY खात्यावर जमा होणारे व्याज हे वार्षिक आधारावर चक्रवाढ केले जात असल्याने, व्यक्तिचलितपणे व्याजाची गणना करणे हे सोपे काम नाही. त्याऐवजी, तुम्ही सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटरचा वापर करून तपशील एंटर केल्यावर मॅच्युरिटी रकमेपर्यंत पोहोचू शकता, जसे की प्रति वर्ष संभाव्य गुंतवणूक रक्कम, मुलीचे वय आणि खाते सुरू होण्याचे वर्ष.

तुम्हाला दोन प्रकारे सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटरचा वापर करून रक्कम कशी काढायची आहे हे दाखवले आहे त्याप्रमाणे तूम्ही ही तुम्हाला पाहिजे ती रक्कम टाकून calaculation करू शकता. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी ५०००/- रुपये गुंतवणूक केल्यास १५ वर्षांनी ७.६% व्याज दराने १४१६१०/-(चक्रवाढ पद्धतीने) इतकी रक्कम मिळेल. आणि २१ वर्षाला एकूण रक्कम २५८८४०/- रुपये मिळतील.

वर्ष प्रारंभिक शिल्लक व्याजदर वार्षिक ठेव रक्कम व्याज ७.६% दराने अंतिम शिल्लक
७.६%५०००३८०५३८०
५३८०७.६%५०००७८९१११६९
१११६९७.६%५०००१२२९१७३९८
१७३९८७.६%५०००१७०२२४१००
२४१००७.६%५०००२२१२३१३१२
३१३१२७.६%५०००२७६०३९०७१
३९०७१७.६%५०००३३४९४७४२१
४७४२१७.६%५०००३९८४५६४०५
५६४०५७.६%५०००४६६७६६०७१
१०६६०७१७.६%५०००५४०१७६४७३
११७६४७३७.६%१०००००६१९२८७६६५
१२८७६६५७.६%५०००७०४३९९७०७
१३९९७०७७.६%५०००७९५८११२६६५
१४११२६६५७.६%५०००८९४३१२६६०७
१५१२६६०७७.६%५०००१०००२१४१६१०
१६१४१६१०७.६%५०००१११४२१५७६५२
१७१५७६५२७.६%५०००१२३६९१७५१२१
१८१७५१२१७.६%५०००१३६८९१९३८१०
१९१९३८१०७.६%५०००१५११०२१३९२०
२०२१३९२०७.६%५०००१६६३८२३५५५८
२१२३५५५८७.६%५०००१८२८२२५८८४०

उदा.मिस्टर आणि मिसेस कदम त्यांच्या ५ वर्षाची मुलगी प्रार्थना साठी या योजनेत दरवर्षी १००००० रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतात आणि सध्या तर व्याजदर ७.६% आहे. त्यानुसार ५ ते २१ वर्षापर्यत कॅल्क्युलेशन करून दाखवते पण पुढे जाऊन जसे वर्ष नुसार व्याज दर बदलेल त्याप्रमाणे तुम्ही त्या व्याजदराने कॅल्क्युलेशन करावे.

वर्ष प्रारंभिक शिल्लक व्याजदर वार्षिक ठेव रक्कम व्याज ७.६% दराने अंतिम शिल्लक
२०२२७.६%१०००००७६००१०७६००
२०२३१०७६००७.६%१०००००१५७७८२२३३७८
२०२४२२३३७८७.६%१०००००२४५७७३४७९५५
२०२५३४७९५५७.६%१०००००३४०४५४८२०००
२०२६४८२०००७.६%१०००००४४२३२६२६२३२
२०२७६२६२३२७.६%१०००००५५१९४७८१४२६
२०२८७८१४२६७.६%१०००००६६९८८९४८४१४
२०२९९४८४१४७.६%१०००००७९६७९११२८०९३
२०३०११२८०९३७.६%१०००००९३३३५१३२१४२८
२०३११३२१४२८७.६%१०००००१०८०२८१५२९४५६
२०३२१५२९४५६७.६%१०००००१२३८३९१७५३२९५
२०३३१७५३२९५७.६%१०००००१४०८५०१९९४१४५
२०३४१९९४१४५७.६%१०००००१५९१५५२२५३३००
२०३५२२५३३००७.६%१०००००१७८८५१२५३२१५१
२०३६२५३२१५१७.६%१०००००२०००४३२८३२१९४
२०३७२८३२१९४७.६%१०००००२२२८४७३१५५०४१
२०३८३१५५०४१७.६%१०००००२९६२०९३५५१२५०
Sukanya Samriddhi Yojana Calculator

खालील परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करता येईल
Sukanya Samriddhi Yojana Discontinued

 • सुकन्या समृद्धी खाते उघडून ५ वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.
 • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
 • लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
 • लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

१. सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू करण्यात आली?

सुकन्या समृद्धी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत, हरियाणात सुरू केली होती

२. सुकन्या समृद्धी योजनाचे पैसे कधी काढू शकतो?

तुम्ही SSY खात्याच्या पासबुकसह रीतसर भरलेला पैसे काढण्याचा फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत सबमिट करणे आवश्यक आहे जिथे खाते सुरू आहे.
मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी, तुम्हाला काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की
लग्नाच्या खर्चासाठी किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी.
खाते मॅच्युरिटी झाल्यावर, खाते असलेल्या मुलीला रक्कम दिली जाईल.
दुसर्‍या प्रकरणात,
तुम्ही खाते वेळेपूर्वी बंद करू शकता आणि खाते उघडण्याची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतरच ठेव रकमेवर दावा करू शकता, खालील कारणांसाठी:
खातेदाराच्या मृत्यूवर.
खातेधारकाचा जीवघेणा आजार.
खाते ऑपरेट करणाऱ्या पालकाचा मृत्यू.

३. सुकन्या समृद्धी योजनेत किती खाती उघडली?

पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत प्रत्येक मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. पण जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत, एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकता.

४. सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे कोण काढू शकतात?

फक्त मुलगी, ज्याच्या नावाने खाते उघडले आहे, ती मॅच्युरिटी झाल्यावर तिच्या SSY खात्यातून पैसे काढू शकते. जर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले नसेल तर पालक पैसे काढू शकतात

५. सुकन्या समृद्धी योजनेसाठी वयाची अट किती आहे?

या योजनेचे खाते मुलीच्या जन्माच्या वेळेपासून उघडले जाणे आवश्यक आहे परंतु मुलगी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पण उघडू शकता.

६. पीपीएफ की सुकन्या समृद्धी योजना कोणती चांगली आहे?

PPF ही सरकार-समर्थित सेवानिवृत्ती बचत योजना आहे तर, SSY ही मुलींच्या विकासासाठी समर्पित सरकार-समर्थित छोटी बचत योजना आहे. दोन्ही खाती कर लाभ देतात.
PPF खाते कोणीही उघडू शकते, SSY खाते फक्त मुलीच्या नावाने ती 10 वर्षे पूर्ण होण्याआधीच उघडू शकते.
PPF शिल्लक एका मर्यादेपर्यंत संपुष्टात आणली जाऊ शकते, तर SSY खात्यासाठी तीच असू शकत नाही.
दोन्ही योजना वेगवेगळ्या उद्देशांसाठी डिझाइन केल्या आहेत आणि म्हणून, दोन योजनांमधील एक चांगला पर्याय निवडणे कठीण आहे.

७. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत प्रतिवर्षी कमीत कमी २५०/- रुपये भरावे लागतात

८. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये भरावे लागतात

९. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे?

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी २१ वर्षाचा आहे

१०. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास किती दंड आकारला जातो?

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास प्रतिवर्षी ५०/- रुपये दंड आकारला जातो.

WEB STORY

अधिक माहितीसाठी खालील वेब स्टोरी बघा.

Leave a Comment