(PYSYM) पीएम श्रम योगी मानधन योजना : दररोज 2 रुपये वाचावा आणि दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळावा. 

पीएम श्रम योगी मानधन योजना २०२२। प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना।Shram Yogi Maandhan Yojana Online Registration | PM Shram Yogi Mandhan Yojana Apply | PM Shram Yogi Mandhan Yojana Launch Date | PM Shram Yogi Mandhan Yojana Eligibility | PMSYM Yojana Apply Online | PMSYM Account Balance check

पीएम श्रम योगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या वृद्धाप काळात आधार देणे आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे.या योजनेद्वारे ज्यांचे मासिक उत्पन्न १५००० रु. किंवा त्याहून कमी आहे आणि त्यांचे वय १८वर्षे -४० वर्षे आहे ते या योजनेत नोंदणी करू शकता. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. पीएम श्रम योगी मानधन योजनेमध्ये आधारित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार,चामड्याचे कामगार (मोची), चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर म्हणून गुंतलेले असतात. कृषी कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार किंवा तत्सम इतर व्यवसायातील कामगार यांना या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल.

LIC, EPFO, ESIC इ. इतर योजना या योजनेअंतर्गत चालतात. ज्या कामगारांचे कोणतेही निश्चित उत्पन्न नाही ते दैनंदिन जीवन जगण्यासाठी करत असलेल्या कामावर अवलंबून असतात ते PM Shram Yogi Maandhan योजनेसाठी अर्ज करू शकता. पात्र लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत स्वत:ची नोंदणी करू शकता या योजने अंतर्गत पेन्शन घेताना लाभार्थी चा मृत्यू झाल्यास त्याच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेपैकी ५०% रक्कम त्यांच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल.

पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दर महिन्याला गुतंवणूक करावी लागेल. गुंतवणूकीची रक्कम वयाच्या आधारावर निश्चित केली जाते.ही रक्कम ५५ ते २०० पर्यंत असते. वयाच्या १८ व्या वर्षी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ५५ रुपये जमा करावे लागतात आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर किमान पेन्शन रक्कम हि दरमहा ३००० रु. व वार्षिक ३६००० रुपये दिली जाईल. या योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेतून लाभार्थी वृद्धपकाळात आपल्या आर्थिक गरजा भागवू शकतो. ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. सरकारी कर्मचारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ चे सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि तसेच या योजनेत सहभागी होणारा श्रमयोगी आयकरदाता नसावा.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत चालवली जाते. निवृत्ती वेतन देखील भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून दिले जाईल. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक CSC केंद्राचे न्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर लाभार्त्याला श्रमिक कार्ड दिले जाईल .जर तुम्हाला या योजनेसंबंधित इतर माहिती मिळवायची असेल तर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकता. हेल्पलाईन नंबर १८००२६७६८८८

MUST READ – ई-श्रम कार्ड साठी नोंदणी कशी करायची ?

PMSYM योजनेचे प्रमुख मुद्दे

योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
कोणी घोषणा केली अर्थमंत्री श्री. पियुष गोयल
घोषणा केली १ फेब्रुवारी २०१९
योजनेची सुरवात १५ फेब्रुवारी २०१९
लाभार्थी असंघटित कामगार
पात्रता १८-४० वर्ष असंघटित कामगार
लाभार्थ्यांची संख्या १० कोटी अंदाजे
योगदान ५५ रुपये ते २०० रुपये पर्यंत
कोणी सुरवात केली केंद्र सरकारने
अधिकृत संकेस्थळ इथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
हेल्पलाईन नंबर १८००-२६७-६८८८
ई-मेल vyapari@gov.in । shramyogi@nic.in
पीएम श्रम योगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा डिजिटल सेवा केंद्राला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता .

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे उद्देश :

या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपये पेन्शन ची रक्कम ने आर्थिक मदत प्रदान करणे.या योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेतून लाभार्थी वृद्धपकाळात आपले जीवन जगू शकतो. PMYSM द्वारे श्रम योगींना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे. भारत सरकार आपल्या योजनांद्वारे सर्व गरीब श्रमिकांना आणि मजुरांना आर्थिक मदत देऊ इच्छित आहे.

पीएम श्रम योगी मानधन योजना फायदे :

  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या ६० वर्ष नंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन रक्कम दिली जाईल.
  • तुम्ही पीएम श्रम योगी मानधन योजनेत जेवढे योगदान करता तेवढीच रक्कम भारत सरकार भारत सरकार तुमच्या खात्यात जमा करते.
  • या योजनेचा लाभ देशातील असंघटित क्षेत्रातील चालक,रिक्षा चालक,मोची , शिंपी, मजूर,वीटभट्टी कामगार इ.कामगारांना मिळणार आहे.
  • तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला पेन्शन रकमेच्या अर्धी रक्कम पेंशन मिळेल.
  • या योजनेअंतर्गत सरकारने दिलेली ३००० रुपयांची स्क्क्म थेट बचत बँक खात्यातुन किंवा लाभार्थ्यांच्या जन धन खात्यातुन ऑटो डेबिट सुविद्वारे हस्तांतरित केली जाईल.

पीएम श्रम योगी मानधन योजनेचे लाभार्थी :

  • सफाई कामगार
  • रिक्षाचालक
  • घरगुती कामगार
  • विणकर
  • वीटभट्टी कामगार
  • चामड्याचे कारागीर
  • मच्छिमार
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • रस्त्यावरील विक्रेते
  • धोबी

पीएम श्रम योगी मानधन योजना पात्रता :

  • पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्जदार हा असंघटित कामगार असावा.
  • अर्जदाराचे वय १८वर्षे ते ४०वर्षे दरम्यान असावे.
  • मासिक उत्पन्न १५००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • सगळ्यात महत्वाचे आयकरदाता या योजनेसाठी अर्ज जर शकत नाही.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड,मोबाईल नंबर आणि IFSC असलेले जनधन खाते किंवा बचत खाते असावे.
  • या योजनेसाठी पात्र व्यक्ती EPFO, NPS आणि ESIC अंतर्गत येऊ

श्रम योगी मानधन योजनेची आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • ओळख पत्र
  • बँक खात्याचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पत्रव्यवहाराचा पत्ता
  • पासपोर्ट साईझ फोटो

PMSYM मानधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?

  • सरकारी कर्मचारी
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
  • राष्ट्रीय पेन्शन योजना
  • राज्य कर्मचारी विमा महामंडळ
  • आयकर भरणारे लोक

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेतील प्रीमियम ची रक्कम :

प्रवेश वय सेवानिवृत्तीचे वय सदस्याचे मासिक योगदान (रु)केंद्र सरकारचे मासिक योगदान (रु)एकूण मासिक योगदान (रु)
३+४ = एकूण (५)
१८६०५५५५११०
१९६०५८५८११६
२०६०६१६११२२
२१६०६४६४१२८
२२६०६८६८१३६
२३६०७२७२१४४
२४६०७६७६१५२
२५६०८०८०१६०
२६६०८५८५१७०
२७६०९०९०१८०
२८६०९५९५१९०
२९६०१००१००२००
३०६०१०५१०५२१०
३१६०११०११०२२०
३२६०१२०१२०२४०
३३६०१३०१३०२६०
३४६०१४०१४०२८०
३५६०१५०१५०३००
३६६०१६०१६०३२०
३७६०१७०१७०३४०
३८६०१८०१८०३६०
३९६०१९०१९०३८०
४०६०२००२००४००
श्रम योगी मानधन योजनेतील प्रीमियम

पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • जे लाभार्थी पात्र आहे आणि ज्यांना पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. प्रथम अर्जदाराला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ, सर्व कागदपत्र घेऊन जवळच्या CSC केंद्रात जावे लागेल.
  • तुम्हाला आता सर्व कागदपत्रे CSC अधिकाऱ्याकडे द्यावे लागेल त्यांनतर CSC अधिकारी फॉर्म भरून अर्जाची प्रिंटर तुम्हाला देईल.
  • तुम्ही ती अर्जाची प्रिंट आऊट भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

PYSYM स्वत:ची नोंदणी :

  • प्रथम तुम्हाला श्रम योगी मानधन योजनेच्या अधिकृत संकेस्थळावर जावे लागेल.
  • आता होमपेज ओपन होईल. मुखपृष्ठावर तुम्हाला click here to apply या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • या पेज वर तुम्हाला Self Enrollment हा पर्याय दिसेल.या पर्यावर क्लिक करावे लागेल .या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला .मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर proceed या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • नवीन स्क्रिन येईल त्यावर तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.नंतर OTP निर्माण करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर OTP टाकून verify वर क्लिक करा.
  • आणि आता यानंतर उर्वरित अर्ज हा भरावा लागेल.आणि तसेच आवश्यक ती कागदपत्रे JPEG मध्ये अपलोड करावी लागेल. त्यानंतर पुर्नवलोकन करून अर्ज सादर करावा लागेल. आणि प्रिंट आऊट काढून भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

CSE VLE Registration :

  • प्रथम तुम्हाला श्रम योगी मानधन योजनेच्या अधिकृत संकेस्थळावर जावे लागेल.
  • आता होमपेज ओपन होईल. मुखपृष्ठावर तुम्हाला click here to apply या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • या पेज वर तुम्हाला CSE VLE च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
PYSYM CSE VLE Registration
PYSYM CSE VLE Registration
  • यानंतर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तूमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. आणि नंतर SIGN IN बटन वर क्लिक करावे लागेल.
  • तुम्हाला योजना या पर्यायावर जाऊन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना निवडावी लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर पीएम श्रम योगी मानधन योजनेचा अर्ज तुमचा समोर उघडेल.
  • या नंतर विचारलेली माहिती जे कि तुमचे नाव, ई-मेल आयडी, पत्ता, राज्याचे नाव, जिल्हाचे नाव अशा प्रकारे भरावी लागेल.
  • यानंतर महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
  • अशा प्रकारे तूम्ही अर्ज करू शकता. आणि अजून काही या योजने बद्दल माहिती हवी असेल तुम्ही कमेंट करू शकता.

अशा काही योजनांसाठी इथे क्लिक करा.

१. PM-SYM म्हणजे काय?

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) ही १५००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्नासह १८ ते ४० वर्षे वयोगटातील प्रवेश वयोगटातील असंघटित कामगारांसाठी स्वयंसेवी आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.

२. पीएम श्रम योगी योजना मानधन योजना कधी सुरु करण्यात आली?

१५ फेब्रुवारी २०१९

३.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

सरकारी कर्मचारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ चे सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही

४. श्रम योगी मानधन या योजनेचा फायदा काय?

जर कोणत्याही असंघटित कर्मचाऱ्याने योजनेची सदस्यता घेतली आणि वयाच्या ६० वर्षापर्यंत नियमित योगदान दिले असेल, तर त्याला किमान मासिक पेन्शन रु.३०००/-. त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर, जोडीदाराला मासिक कौटुंबिक पेन्शन मिळेल जे पेन्शनच्या५०% आहे.

Leave a Comment