PM Kisan Registration 2022 |PM Kisan Yojana ।पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३| प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता ।प्रधानमंत्री किसान योजना E-Kyc |PM Kisan beneficiary list village wise |PM Kisan Registration Last Date| PM Kisan Samman Nidhi ।पीएम सम्मान निधी योजना २०२२ लाभार्थी स्थिती ।PM Kisan Login । पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?
PM Kisan Registration 2022
पीएम किसान हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे संक्षिप्त रूप आहे, ही योजना भारत सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सुरु केली आहे. पात्र शेतकऱ्यांसाठी पीएम किसान नोंदणी २०२२ ची तारीख वाढविण्यात आली आहे, जो कोणी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे तो त्यासाठी अर्ज करू शकतो. पीएम किसान नोंदणी २०२२ बाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा लेखासोबतच राहा आणि किसान योजनेबद्दल जाणून घ्या.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. जे शेतकरी पात्र आहे आणि अजूनही या योजनेची नोंदणी केली नाही ते संबंधित पोर्टल ला जाऊन अर्ज करू शकता. ही योजना पीएम मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ ला सुरु केली. यानंतर लाखे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्रीय अर्थसंकल्प:
मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३ मध्ये पीएम किसान योजनेसाठीत तीन हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे. मात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० रुपयांच्या मदत रकमेत कोणताही बदल झालेला नाही. मागील अर्थ संकल्पाच्या तुलनेत या योजनेसाठी ३००० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली . २०२१-२०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये मोदी सरकारने ६५००० कोटी रुपयांची तरतूद केली होती.यावेळेस ती रक्कम वाढून ६८००० कोटी झाली आहे. याबरोबरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी म्हणजे १ फेब्रुवारी २०२२ अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्या बाबत अनेक घोषणा केल्या.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे ही संख्या आता जवळपास १२ कोटी ४७ हजार लाखावर पोहचली आहे, २०१८ पासून मोदी सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करत आहे, या योजनेसाठी सरकारने आतापर्यंत १० हप्ते जारी केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत प्रति वर्षे ३ सामान हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. याशिवाय या अर्थसंकल्पात पीएम फसलं विमा योजनेची रक्कम कमी करण्यात अली आहे. २०२१-२०२२ या अर्थसंकल्पात या योजनेमध्ये १६००० कोटी ची रक्कम वाटप करण्याचा प्रस्ताव केला होता. यावेळी ही रक्कम १५५००कोटी इतकी करण्यात आली आहे. यावर्षी ५०० कोटी कमी कमी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून पीएम किसान योजना राबवत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००रुपये दिले जाते. नुकतेच पीएम मोदीनी १० व्या हप्त्याचे पैसे १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांना हस्तांतरित केले. लवकरच पीएम किसान योजनेचा ११ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल-जुलै महिन्यात येऊ शकतो.
पीएम किसान सन्मान निधी योजना ठळक मुद्दे
योजनेचे नाव | पीएम किसान सन्मान निधी योजना |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकार |
घोषणा कधी केली | १ डिसेंबर २०१८ |
कधी सुरु झाली | २४ फेब्रुवारी २०१९ |
शेवटची तारीख | ३० सप्टेंबर २०२२ |
विभाग | कृषी सहकार व शेती कल्याण विभाग |
लाभ | ६००० रुपये प्रति वर्षे ३ सामान हप्त्यांमध्ये |
Budget | 75000/- crore |
हेल्पलाईन नंबर | १५५२६१/०११-२४३०३६०० |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
वार्षिक हप्ता कधी जारी केला जातो?
- पहिला हप्ता- एप्रिल-जुलै
- दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर
- तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता खालील प्रमाणे: Eligibility Of PM Kisan Yojana
- सरकारच्या माहिती मध्ये शेतकरी किंवा जमीन मालकाचे नाव असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ. मूलभूत कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे भूमी अभिलेख (७/१२) असणे आवश्यक आहे.
- पीएम किसान योजनेचे फायदे मिळविण्यासाठी नागरिकत्व प्रमाणपत्र, जमीन मालकीची कागदपत्रे,आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
कोणत्या लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही.
जे लोक आयकर भरतात. तसेच डॉक्टर, चार्टड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
प्रधानमंत्री किसान योजनेचा फायदा कोणाकोणाला होतो?
प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर जमीन आहे आणि ज्यांचे वय १८ वर्षे-४० वर्षे असेल अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे आणि ती शेती बागायती असणे म्हणजे त्यात पीक येत असलेली जमीन हवी तेव्हाच या योजनेचा लाभ होणार आहे.
पीएम किसान योजना २०२२ साठी नोंदणी कशी करावी? How to register for PM Kisan Yojana 2022?
- प्रथम पीएम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळ भेट दिली पाहिजे.
- यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणीचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर त्या टॅबवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी प्रकार विचारला जाईल.
- तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर ग्रामीण शेतकरी नोंदणी निवड आणि शहरी भागातील असल्यास शहरी शेतकरी नोंदणी असे निवडा.
- आता पूर्ण फॉर्म चा तपशील आधार नंबर, मोबाईल नंबर, राज्य, कॅपचा कोड टाकून ओटीपी पाठवा.
- तुम्हाला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो भरा अशाप्रकारे नोंदणी करा त्यामध्ये पुढील पेज वर अजून जी माहिती विचारलेली आहे ती भरा.
- आता आवश्यक ती कागदपत्रे विचारलेली आहे ती अपलोड करून नोंदणीची ची प्रक्रिया पूर्ण करा.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?
- सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर भेट द्या.
- त्या होमी पेज च्या उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
- त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.
- आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाइल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.
- वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला तुमचे नाव मिळेल.
पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?
प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे ही रक्कम त्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते त्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. आधार जोडण्यासाठी काय करायचे ते आता बघू
- सर्वप्रथम अर्जदाराने जिथे बँक खाते आहे, त्या बँक मध्ये जावे लागेल.
- अर्जदाराने बँक यामध्ये जाताना आधार कार्ड ची छायांकित प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जावी लागेल.
- आता तुम्हाला आधार कार्ड च्या कॉपी वर सही करून बँक खाते क्रमांक जोडावा लागेल. आणि हे कागदपत्रे बँकांच्या अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल.
- त्या नंतर बँकेच्या अधिकारी तूमचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर जोडतील.
( टीप : तुम्ही पीएम किसान योजनेच्या नोंदणी सुरु करण्याच्या आधी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ठेवा नोंदणीच्या वेळेस ती अपलोड करावी लागतात. )
पीएम सम्मान निधी योजना २०२२ लाभार्थी स्थिती कशी तपासायची? हि माहिती तुम्हाला या इथे क्लिक केल्यावर मिळेल.
PM Kisan beneficiary list village wise Click Here
योजनांसाठी इथे क्लिक करा.
Pradhanmantri Kaushal Vikas Yojana
FAQ
१.प्रधान मंत्री किसान सन्मान निधी म्हणजे काय?
सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्रियाकलाप तसेच घरगुती क्षेत्राशी संबंधित विविध निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही नवीन केंद्रीय क्षेत्र योजना सुरू केली आहे. गरजा योजनेअंतर्गत, लक्ष्यित लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी संपूर्ण आर्थिक दायित्व भारत सरकार उचलेल.
२.प्रधानमंत्री किसान योजनेसाठी E-Kyc कशी करायची?
प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळ भेट दिली पाहिजे.
Farmers Corner च्या पेज वर E-Kyc ऑपशन वर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल तेव्हा आधार क्रमांक टाकून search या टॅब वर क्लिक करा.
नंतर आधार कार्ड ला जो मोबाईल लिंक आहे तो नंबर टाका.त्यानंतर त्यावर ओटीपी येईल.
ओटीपी आला असेल तो भरा आणि submit या बटण वर क्लिक करा.
३. प्रधानमंत्री किसान योजना E-Kyc साठी शेवटची तारीख कोणती आहे?
३१ मार्च २०२२
४. आपण पीएम खात्याबरोबर आधार कार्ड ऑनलाईन जोडू शकतो का?
अद्याप नाही .बँकेत जाऊन तुम्हाला ही माहिती मिळेल.
4 thoughts on “PM Kisan Registration 2022 Apply online at pmkisan.gov.in”