PM Kisan Samman Nidhi Yojana 2021। पीएम किसान योजना

PM Kisan Samman Nidhi Yojana 2021। Pm Kisan Samman Nidhi Yojana ।beneficiaries status । पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावीपीएम किसान सम्मान निधी योजना २०२१ पात्रता

pm-kisan-samman-nidhi-yojana-2021/

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अजूनही पीएम किसान योजने अंतर्गत स्वतः:ची नोंदणी केली नसेल तर तुम्ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर आणि तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यात २००० रु. मिळतील आणि डिसेंबर मध्ये २०००रु. दुसरा हप्ता मिळू शकतो.

पीएम किसान सम्मान निधी योजना २०२१ हि भारत सरकारच्या १००% निधीसह एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना लहान आणि मध्यम श्रेणीतील शेतकऱ्याच्या कमाईला पूरक ठरण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली. डिजिटल इंडियाच्या उपक्रमासह या योजनतेमुळे देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचवणे सोपे झाले. या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार समर्थ शेतकरी कुटुंबाची ओळख करेल. आणि हा निधी थेट लाभधारकाच्या बँक खात्यात जमा होतो.

छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी करण्याच्या हेतूने सरकारने देशभरातील छोट्या आणि उपेक्षित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकाराकडे दुर्लक्ष करून त्यांना ६००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु केली.

pm-kisan-samman-nidhi-yojana-2021/

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana

पीएम सम्मान निधी योजना २०२१ लाभार्थी स्थिती कशी तपासायची?

How to check the status of Pm Kisan Samman Nidhi Yojana 2021 beneficiaries? https://pmkisan.gov.in/beneficiarystatus.aspx

पीएम सम्मान निधी योजना लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल. प्रथम पीएम किसान सम्मान निधी योजना चा होम पेज https://pmkisan.gov.in ला भेट द्या. त्या नंतर होम पेज वर शेतकरी विभागात लाभार्थी स्थिती ( Beneficiary status ) टॅब वर क्लिक करा. लाभार्थी स्थिती वर क्लिक केल्यावर एक पर्याय निवडा – आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर या तीन पर्याय मधून निवडलेला पर्याय निवडल्यानंतर माहिती मिळवा ( data )वर क्लिक करा. त्या नंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल.

पीएम सम्मान निधी योजना २०२१ लाभार्थी यादी कशी तपासायची ?

How to check the list of Pm Kisan Samman Nidhi beneficiaries ?https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

सर्व प्रथम पीएम किसान सम्मान निधी योजना चा होम पेज जा त्यानंतर होम पेज वर शेतकरी विभागात लाभार्थी यादी टॅब वर क्लिक करा. मग पुढचे पान उघडेल. पुढील पानावर तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक, आणि गाव निवडावे लागेल. त्यानंतर निवड केल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लाभार्थी यादी उघडली जाईल मग तुम्हाला तुमचे नाव दिसले तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी आहात.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या ऑफिसिअल वेबसाईड ला भेट द्या.https://pmkisan.gov.in

आता होम पेज वर फार्मर्स कॉर्नर विभाग पहा. आता नवीन ‘शेतकरी नोंदणी’ निवडा. तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा.

अचूकपणे कॅप्चा कोड प्रविष्ट करा. आणि नंतर फॉर्मच्या पुढील पेज वर जाण्यासाठी सबमिट वर क्लिक करा. शेत आणि बँक खात्याचा तपशील संबंधित माहिती भरा.आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

पीएम किसान सम्मान निधी योजना २०२१ पात्रता :

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकरी, ज्यांचे वय १८ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे आणि ४० वर्ष वयापर्यंत आहे आणि जे नमूद केल्याप्रमाणे वगळण्याच्या निकषांच्या कक्षेत येत नाही. मार्गदर्शक तत्वे या योजनेत सामील होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजना २०२१

Name of SchemePM Kisan Samman Nidhi Yojana
Types of Scheme ( Category )Central Government Scheme
Effective  From01-12-2018
Date of Launch24-02-2019
Revision of Scheme01-06-2019
DepartmentDepartment of Agriculture Cooperation and Farmers welfare
Benefits6000/- per year in three equal installments
Budget75000/- crore
PM Kisan Helpline No 155261 / 011-24303600
Official Websitehttps://pmkisan.gov.in

पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • नागरिकत्व प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती
  • जमीनधारक कागदपत्र (७/१२)

खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

१ सर्व संस्थापक जमीन धारक

२ शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये आहेत.

  1. संवैधानिक पद धारण करणारे /केलेले आजी व माजी व्यक्ती
  2. आजी/माजी मंत्री /राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/ विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
  3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थाच्या अखत्यारीतील कार्यलयांमधील आणि स्वायत्त संथाचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थनिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  4. सर्व निवृत्तिवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.१००००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  5. मागील वर्षात सर्व आयकर भरलेल्या व्यक्ती.
  6. नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी, लेखापाल, वास्तु विशारद इ. क्षेत्रातील व्यक्ती

3 thoughts on “PM Kisan Samman Nidhi Yojana 2021। पीएम किसान योजना”

Leave a Comment