PM Kisan Yojana 2022 । पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता कधी मिळणार?

Pm Kisan next installment in 2022 । PM Kisan Yojana 2022 । पीएम किसान योजना मराठी । पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता । पीएम किसान योजना स्थिती कशी तपासायची। PM Kisan next installment Beneficiary Status 2022 ।

पीएम किसान योजना मराठी। PM Kisan Yojana 2022

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार पीएम किसान योजना राबवत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १० हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ११व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

काय आहे पीएम किसान योजना ?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांची असते. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात. म्हणजे वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १० वा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता.

पीएम किसान योजना ११वा हप्ता केव्हा मिळणार?

PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम नरेंद्र मोदी लवकरच PM Kisan चा ११वा हप्ता रिलीज करणार आहेत. मात्र हा हप्ता पाठवण्यापूर्वी सरकारने काही नियमांची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. ११व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकरी ११व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत वेळ दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत E-KYC केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करावे. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी त्यांचे ई-केवायसी करू शकतात. याशिवाय शेतकरी सीएससी केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

PM Kisan Yojana 2022 E-KYC कशी अपडेट करायची ?

EKYC ही दोन प्रकारे करता येते PM किसान खात्याचे E-KYC दोन प्रकारे केले जाऊ शकते. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन शेतकरी त्यांचे खाते E-KYC करून घेऊ शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, तुम्ही ऑनलाइन E-KYC देखील करू शकता.

 • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
 • आता तुमचा समोर होम पेज उघडेल.
 • यानंतर, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या Farmers Corner ekyc या टॅब वर क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हालाआधार नंबर विचारला जाईल.
PM Kisan Yojana 2022
PM Kisan Yojana 2022 । पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता कधी मिळणार?
 • आता आधार नंबर तिथे टाका.
 • त्यानंतर तुम्ही Search बटन वर क्लिक करा. येथे तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय उघडेल.
 • मोबाईल नंबर टाकल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ४अंकी OTP येईल.
 • त्यानंतर Aadhaar authentication साठी तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा ६अंकी OTP येईल.
 • OTP टाकल्या नंतर Submit बटण वर क्लिक करा.
 • E-KYC केल्यानंतर, तुम्हाला एक मेसेज मिळेल की E-KYC योग्य प्रकारे केले गेले आहे.
 • अशाप्रकारे E-KYC पूर्ण होईल.
 • PM Kisan Yojana E-KYC केल्यानंतर, २०००रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा केला जाईल.
 • OTP टाकताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तुम्ही CSC केंद्रांना भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करू शकता.

पीएम किसान योजना स्थिती कशी तपासायची?

 • हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, प्रथम तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइट ला भेट द्या.
 • आता Farmers Corner वर क्लिक करा.
 • आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
 • आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
 • येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
 • यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी तपासायची? । PM Kisan Beneficiary Status 2022

 • प्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
 • त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
 • Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
 • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.

पीएम किसान योजना खात्यावर पैसै जमा झाले नाहीत तर येथे तक्रार करू शकता.

 • पीएम किसान टोल फ्री नंबर : १८००११५५२६६
 • पीएम किसान हेल्पलाइन नंबर :१५५२६१
 • पीएम किसान लैंडलाइन नंबर :०११-२३३८१०९२, २३३८२४०१
 • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन :०११-२४३००६०६
 • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन :०१२०-६०२५१०९
 • ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

Leave a Comment