E-Shram Card Registration Online | E-Shram Card Download | E-Shram Card Self Registration |E-Shram Portal | Benefits of E-Shram Card | eshram.gov.in | CSE Login | Shramik card process in Marathi | ई श्रम कार्ड म्हणजे काय | ई-श्रम कार्ड योजनेचा उद्देश, फायदे आणि पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ई श्रम कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा |
E-Shram Card हि योजना भारत सरकारने २०२१ मध्ये सुरु केली. ई-श्रम कार्ड योजना हि देशातील सर्वात महत्वाची योजना आहे हिची सप्टेंबर २०२१ मध्ये घोषणा केली होती. या योजने अंतर्गत देशातील विविध काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामानुसार विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. ई-श्रम योजना ही देशातील १८ वयोगटापासून पुढील सर्व नागरिकांना उपयुक्त अशी योजना आहे. या योजने अंतर्गत ई-श्रम कार्ड नोंदणी करून घेतल्याने देशातील विविध नागरिकांना देशातील राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. या लेखामध्ये आपण ई-श्रम योजने अंतर्गत नोंदणी कशी करायची, ई-श्रम योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ई-श्रम योजनेची उद्दिष्टये, ई-श्रम कार्ड योजनेची फायदे, आणि ई-श्रम कार्ड download कसे करायचे या सर्व गोष्टीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
E-Shram Card पोर्टल हे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सुरु केले. २६ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्र सरकारद्वारे हे पोर्टल विकासित करण्यात आले आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालय हे भारत सरकारच्या सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक आहे. त्यानुसार, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी E-SHRAM पोर्टल विकसित केले आहे, ज्याला आधार सोबत जोडले जाईल. त्यामध्ये नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्याचे प्रकार आणि कौटुंबिक तपशील इत्यादी तपशील त्यांच्या रोजगारक्षमतेची इष्टतम प्राप्ती करण्यासाठी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ देण्यासाठी असतील. स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार इत्यादींसह असंघटित कामगारांचा हा पहिलाच राष्ट्रीय डेटाबेस आहे.
पीएम मोदी यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी हि योजना सुरु केली आहे. देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना पोहचवू शकता त्याचबरोबर नवीन बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकता. जर तुम्ही श्रम आणि रोजगारासाठी या पोर्टल वर नोंदणी केली तर तुम्हाला श्रमिक कामगारांची एक विशिष्ट ओळख UAN card ( युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ) दिले जाईल. तुम्ही या पोर्टल वर फक्त CSE सेवा केंद्राद्वारे नोंदणी करू शकता आणि मोफत अर्ज करू शकता.
ई-श्रम कार्ड पोर्टल चे काम काय असणार ?
ई-श्रम पोर्टल च्या मदतीने कामगारांची माहिती गोळा केली जाते. मग त्याच आधारावर सरकार कामगारांसाठी योजना बनवेल. योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचेल याची खात्री सरकार करेल. शासनाच्या वतीने देशातील सर्व कामगारांना ओळखपत्र आणि आधार कार्डच्याच्या मदतीने कामाच्या आधारे श्रेणीमध्ये विभागले जाणार आहे. यावर सरकार कामगारांची नोंद तयार करेल.
ई-श्रम पोर्टल CSE मध्ये ऑनलाईन नोंदणी कोण करू शकते?
- पशुपालन कामगार
- CSE केंद्र चालक
- अशा कार्यकर्ता
- शेतमजूर/सीमांत शेतकरी
- बांधकाम कामगार
- सुतार
- कोळी
- मनरेगा कमगार
- वीटभट्टीवर काम करणारे
- न्हावी
- घरगुती कामगार
- भाजीपाला विक्रेते
- फळ विक्रेते
- वृत्तपत्र विक्रेते
- हातगाडी ओढणारे
- ऑटो रिक्षा चालक
- घरकाम करणारे कामगार
- दूध उत्पादक शेतकरी स्थलांतरित कामगार
ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे :
- पत्याचा पुरावा
- मोबाईल नंबर ( आधार क्रमांक शी संलग्न असणे आवश्यक आहे.)
- वयाचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधार क्रमांक
- वोटर आयडी
- ई-मेल आयडी
ई-श्रम कार्ड योजनेचे उद्दिष्टये :
केंद्र सरकारची ई-श्रम कार्ड भत्ता योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार, बांधकाम कामगार प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार, रिक्षा, टमटम, फळ-भाजीपाला विक्रेते, कृषी कामगार, घरगुती काम करणारे कामगाराना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे करून अशा कामगारांना या पोर्टलच्या माध्यमातून कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेन. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आर्थिक संकटातून जात असलेल्या गरीब लोकसंख्येला मदत करू इच्छितात जेणेकरून ते कोणावरही अवलंबून न राहता त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील.
ई-श्रम कार्ड योजना पात्रता
- लाभार्थी भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि त्यांनी भारतात काम केले पाहिजे.
- दारिद्र्यरेषेखालील नोंदणीकृत कामगारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- लाभार्थी 16-59 वर्षे वयोगटातील असावेत
- लाभार्थी चे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते आयकर भरणारे नसावेत
- त्यांच्याकडे त्यांच्या आधार कार्डशी जोडलेला वैध मोबाईल क्रमांक असावा. जर फोन नंबर लिंक केलेला नसेल, तर अर्जदार जवळच्या CSC वर जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात.
ई-श्रम कार्ड योजनेचे फायदे
- ई-श्रम कार्ड साठी नोंदणी केलेल्या कामगारांना भारत सरकार मार्फत विमा संरक्षण दिले जाईल.
- ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केलेल्या कामगारांना अपघात मृत्यू झाला तर त्या २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
- ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केलेल्या कामगाराने अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल.
- ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केलेल्या कामगाराने आंशिक अपंगत्व झाले तर त्याला १ लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे.
- जर तुमचे ई-श्रम कार्ड बनवले असेल, तर वयाच्या ६० वर्षांनंतर, तुम्हाला या कार्डद्वारे दरमहा ₹ 3000 पेन्शन मिळेल.
- जर तुमचे ई-श्रम कार्ड बनले असेल, तर तुम्हाला पीएम आवास योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपयांची आर्थिक मदत देखील मिळेल.
- ई-श्रम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या पत्नीला ई-श्रम कार्ड भत्त्याचा लाभ मिळतो, ज्या अंतर्गत 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते
ई-श्रम पोर्टल माहिती २०२१
विभाग | श्रम आणि रोजगार विभाग |
योजना | ई-श्रम कार्ड योजना ( ई-श्रम पोर्टल) |
लाभार्थी | भारतीय श्रमिक |
वर्ष | २०२१ |
नोंदणी करण्याची पद्धत’ | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
हेल्पलाईन नंबर | १४४३४ |
ई-श्रम कार्ड नोंदणी कशी करावी?
- प्रथम तुम्हाला ई-श्रम चा अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- यानंतर होमपेज वर तुम्हाला ई-श्रम registration वर क्लिक करावे लागेल.
- आता या लिंक वर क्लिक केले कि दुसरे पेज उघडेल.
- आता Self Regisration चा form समोर दिसेल त्यात तुमच्या आधार बरोबर लिंक केलेला मोबाइल नंबर, कॅप्टचा कोड आणि ई पी एफ यो आणि इ एस आय सी ( EPFO And ESIC ) भरावी लागेल.
- माहिती भरल्यानंतर तुम्हाला OTP Send बटन वर क्लिक करावे लागेल. मोबाईल वर OTP आल्यानंतर तो OTP भरावा लागेल आणि registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि OTP पर्याय निवडावा लागेल.
- आता तुम्हाला प्रदर्शित कॅप्चा कोड भरावा लागेल, चेक बॉक्सवर टिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा .
- आता तुम्हाला आधार कार्डवरून मिळालेला OTP टाकावा लागेल .
- आता तुमच्या स्क्रीनवर ई श्रम नोंदणी फॉर्म उघडेल .
- आता तुम्हाला तुमची सर्व माहिती नोंदणी फॉर्ममध्ये काळजीपूर्वक भरावी लागेल .
- नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या भरल्यानंतर , सेव्ह करा आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये टाकलेली माहिती तपासावी लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली.
E-Shram Download In Marathi
- सर्वप्रथम तुम्हाला https://eshram.gov.in/ वर जावे लागेल .
- आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर आधीच नोंदणीकृत दिसेल. तुम्हाला अपडेट पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला तुमचा UAN नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकून लॉगिन करावे लागेल .
- आता तुम्हाला डॅशबोर्डवरील Download Your E-Shram Card PDF या पर्यायावर क्लिक करून तुमचे ई-श्रम कार्ड डाउनलोड करावे लागेल
ई-श्रम पोर्टल च्या अंतर्गत लाभ दिलेल्या योजना:
- प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
- राष्ट्रीय पेंशन योजना
- सामाजिक सुरक्षा कल्याण योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
- दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना
- मनरेगा रोजगार योजना
- विणकरांची आरोग्य विमा योजना
- कामगार पुनर्वसन स्वयंरोजगार योजना
- अटल पेंशन योजना
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
- राष्ट्रीय सामाजिक सहाय्य्य कार्यक्रम
- राष्ट्रीय सफाई कामगार
- वित्त आणि विकास महामंडळ
अशाच काही योजनाचा माहिती इथे दिली आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना | दिल्ली श्रमिक मित्र योजना |
पीएम शौचालय योजना ऑनलाईन नोंदणी | मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा? |
ई-श्रम कार्ड योजना भागधारक ( Stakeholder )
- Ministry of Labour and Employment
- Ministry of Electronics & Information Technology (MeitY)
- National Informatics Centre (NIC)
- State / UT Governments
- Line Ministries/Departments of Central Govts
- Workers Facilitation Centre and Field Operators
- Unorganised Workers & Their Families
- UIDAI
- NPCI
- ESIC & EPFO
- CSC-SPV
- Department of Posts Through Post Offices
- Private sector partners
ई-श्रम हेल्पलाईन :
तुम्हाला या लेख मध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला काही अडचण येत असेल फॉर्म भरतांना तर तुम्ही ई-श्रम च्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता या त्यांना मेल हि करू शकता
हेल्पलाईन नंबर – १४४४३
ई-मेल आयडी – eshram-care@govin
ई-श्रम योजनेच्या महत्वाच्या लिंक्स
FAQ
१. ई-श्रम ची अधिकृत संकेस्थळ ( website ) काय आहे?
eshram.gov.in
२. E-Shram Card पोर्टल कधी विकसित करण्यात आले?
२६ ऑगस्ट, २०२१
३. ई-श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, प्रमाणपत्र, व्यवसायाचा उपन्न प्रमाणपत्र, पत्याचा पुरावा,
वयाचा पुरावा, वोटर आयडी, ई-मेल आयडी, फोटोग्राफ, बँक डिटेल्स
2 thoughts on “E-Shram Card Registration Online 2024। ई-श्रम कार्ड नोंदणी कशी करावी?”