PM Awas Yojana list 2021

How to check PM Awas Yojana List – ऑनलाईन नोंदणी प्रधानमंत्री आवास योजना लिस्ट २०२१ – PM Awas Yojana List 2021 – Download Pm Awas yojana pmaymis.gov.in

प्रधानमंत्री आवास योजना मध्ये (Pm Awas Yojana ) नाव कसे तपासावे आणि लाभार्थ्यांची संपूर्ण यादी कशी पहावी.

प्रधानमंत्री आवास योजना (Pm Awas Yojana )हि भारतातील नरेंद्र मोदी सरकारने सुरु केलेल्या अनेख प्रमुख योजनांपैकी एक आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( PMAY-G ) आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी ( PMAY-U ) साठी PMAY यादी २०२१-२०२१ प्रकाशित केली आहे. तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी आणि शहरी यादी २०२०-२०२१ ची यादी अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता.

PM आवास योजना (PM Awas Yojana) २०१५ सुरु करण्यात आलेली भारतातील शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबांना स्वतः ची घरे मिळवण्यासाठी मदत करते. या योजने अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एकत्र काम करतात आणि एकत्र काम करून देशातील गरीब नागरिकांना लाभ देत आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीब लोकांच्या हितासाठी सरकार कडून सर्वतोपरी प्रयत्न केलं जात आहेत जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. जे लोक झोपडपट्यासारख्या कच्या घरात राहतात, त्यांना पक्की घरे बांधण्यासाठी सरकार कमी व्याजाने कर्ज देईल. हि कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.

PM awas yojana list 2021

पीएम आवास योजना लिस्ट २०२१ ( PM AWAS YOJANA)
प्रधानमंत्री आवास योजनतेसाठी पात्रता :-
  • पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय २१ ते ५५ वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदाराला आधी कोणतेही घर नसावे.
  • अर्जाला या योजनेचा लाभ आधीच मिळालेला नसावा.
  • व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री आवास योजनयाचे उद्देश :-

  • पीएम आवास योजनेचा सुरु करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे आहे कि देशातील सर्व गरीब आणि कमकुवत कुटुंबे आणि ज्यांचे उत्पन्नाचे साधन नगण्य आहे आणि ज्यांच्याकडे स्वत: चे घर नाही आणि जे लोक त्यांचे जीवन जगत आहे त्यांच्यासाठी झोपडपट्टीत सरकारने अशा लोकासाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत या सर्व लोकांना पक्की घर द्यावी लागतील .
  • यासाठी सरकारने कमी व्याजदरात बँके मार्फत कर्जाची रक्कम उपलब्ध करून देता येईल जेणेकरून त्याला त्याचे कच्चे घर निश्चित करण्यात येतीय.

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रकार :-

प्रधानमंत्री आवास योजनेचे पुढील दोन प्रकार आहेत.

१ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( PMAY-G ) :

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चा उद्देश भारताच्या ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी आणि सुलभ घरे ( दिल्ली आणि चंदीगड वगळता ) प्रदान करणे.

२ प्रधानमंत्री आवास योजना शहरी ( PMAY-U ) :

प्रधानमंत्री आवास योजना शहरी चा उद्देश भारताच्या शहरी भागातील नागरिकांना परवडणारी घर उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी तीन टप्प्यात राबवली जाते.

व्यक्तींना त्यांच्या उत्पन्नानुसार ३ वर्गामध्ये विभागले गेले आहे.

EWS अर्जदाराचा पगार ० ते ३ लाख रुपयांदरम्यान असावा.

LIG – अर्जदाराचा पगार ३ लाख ते ६ लाख रुपये असावा.

MIG – अर्जदाराचे वार्षिक वेतन १२ लाख ते १८ लाख असावे.

EWS आणि LIG गटातील कुटूंबातील मुख्य सदस्त्य महिला असावी.

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन नोंदणी :

पीएम आवास योजना ( PM Awas Yojana ) ऑनलाईन नोंदणी साठी प्रथम पीएम आवास योजनेच्या होम च्या https://pmaymis.gov.in या लिंक वर जावे लागेल. त्याच्या होम पेज वर Citizen Assessment टॅब वर जाऊन दिलेल्या पर्यायांमधून तुम्हाला तुमच्यानुसार पर्याय निवडावा लागेल.

In Situ Slum Development (ISSR), Affordable Housing In Partnership (AHP), Beneficiary Lead Construction /Enhancement (BLC/BLCE), Credit Link Subsidy Scheme (CLSS)

Online Registration PM Awas Yojana
How to apply for Pradhanmantri Awas Yojana

कोणताही पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल. नवीन होम पेज वर आपला आधार क्रमांक किंवा आधार कार्ड प्रमाणे नाव प्रविष्ट करा. आता चेक च्या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यावर पीएम आवास योजनेचा अर्ज तुमच्या समोर उघडेल.आता तुम्ही अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे : राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, शहराचे नाव, कुटुंबाचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, पत्ता, वय, मोबाइल नंबर, आणि कॅप्टचा कोड इ. भरून तुम्ही सर्व कागदपत्रे जे अर्जामध्ये विचारले आहे ते अपलोड करा. आता सबमिट बटण वर क्लिक करा त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

पीएम आवास योजनेची स्थिती कशी तपासायची? https://pmaymis.gov.in/Track_Application_Status.aspx

पीएम आवास योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व प्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईड ला pmaymis.gov.in भेट दया. आता होम पेज वर दिलेल्या पर्याय Citizen Assessment क्लिक केले कि तेथे तुम्हाला Track Your Assessment status या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर तूमच्यासमोर एक पान उघडेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती दोन प्रकारे तपासू शकता. जसे तुमचे नाव ,वडिलांचे नाव, मोबाइल नंबर किंवा Assessment Id द्वारे.

How to check pm awas yojana list 2021

Leave a Comment