काय आहे ‘कृषी कर्ज मित्र योजना’ 2021आता शेतकऱ्यांना मिळणार लगेच कर्ज

Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना २०२१ | कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्देश | योजनेचे स्वरूप

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. २१ ऑक्टोबर २०२१ ला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्याचा सांकेतांक २०२११०२११६०९४८१८२० हा आहे. या योजनेसाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

कृषी कर्ज मित्र योजना : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँक, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढयांमार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. यामध्ये शेतकरी हा जिल्हा मध्यवर्ती किंवा सहकारी बँकेकडे जाण्यास प्राधान्य देतो . सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत कर्जाचे वितरण केले जाते. शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असतांना त्याला ७/१२ उताराऱ्यापसून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र( NOC ) इत्यादी कागदपत्रे गोळा बराच कालावधी लागतो आणि जेव्हा शेतकऱ्याला कर्ज पाहिजे असते तेव्हा ते कर्ज मिळत नाही आणि त्यांच्या पिकाचा हंगाम निघून जातो.आणि नाईलाजाने शेतकऱ्यांना सावकाराकडून जास्त व्याजाने कर्ज घ्यावे लागते. अशा पद्धतीने शेतकरी कर्ज मिळविण्यासाठी खूप संकटांना तोड देत असता त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना राबविण्यात येत आहे.यामुळे कृषी कर्ज मित्र म्हणून सरकार कडून रोजगार हि उपलब्ध होत आहे.

कृषी कर्ज मित्र योजना‘ ( Krushi Karj Mitra Yojana ) शेतकऱ्यांना कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्या स मदत करेल. जिल्हा परिषदेमार्फत कृषी कर्ज मित्र हे ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन कर्ज प्रकरणाची माहिती द्यायची आहे तसेच असणारी कागदपत्रे जमा करून त्यानंतर शेतकऱ्यांच्या संमतीने कृषी कर्ज मित्र कर्ज मंजुरीसाठी बँकाकडे अर्ज करतील. कृषी कर्ज मित्रा कडून पारदर्शी आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना साह्य आणि सल्ला देण्याविषयीचे बंधनपत्र घेणे आवश्यक असेल. कृषी कर्ज मित्रास शुल्क देण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

कृषी कर्ज मित्र योजना
कृषी कर्ज मित्र योजना २०२१

कृषी कर्ज मित्रास सेवा शुल्क देण्यासाठी तालुका स्तरावर समिती बसविण्यात येते.खालीलप्रमाणे

  • गट विकास अधिकारी
  • सहायक निबंधक सहकारी संस्था
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी
  • जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी
  • तालुका कृषी अधिकारी
  • कृषी अधिकारी पंचायत समिती

कृषी कर्ज मित्र योजना कालावधी :

  • कृषी कर्ज मित्र योजना कालावधी हा सन २०२१-२०२२ हे आर्थिक वर्ष असेल.
  • सदर योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.

सेवाशुल्क दर :

अल्प मुदतीसाठी कर्ज : प्रथम कर्ज पीक घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रति प्रकरण १५०/- रुपये सेवाशुल्क असेल.

माध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज : नवीन कर्ज पीक घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रति प्रकरण २५०/- रुपये सेवाशुल्क असेल. कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण ( Renewal ) प्रति प्रकरण सेवा शुल्क २००/-रुपये असेल.

योजनेचे नाव कृषी कर्ज मित्र योजना
कोणी मान्यता दिली राज्य सरकार
लाभार्थी शेतकरी
उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज काढण्यासाठी मदत
कधी मान्यता दिली २१ ऑक्टोबर २०२१
ऑफसिअल वेबसाइड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे वेबसाइड
Krushi Karj Mitra Yojana

कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्देश :

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजपणे व विनाविलंब होण्या करिता सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशासाठी हि योजना राबविण्यात आली आहे.

कृषी कर्ज योजनेचे स्वरूप :

दरवर्षी शेतकरी कर्ज घेतल्यानंतर त्याच्या वेळेमध्ये कर्जाची परतफेड करत असतात आणि नियमितपणे कर्ज घेत ही असतात पण काही वेळेला या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी तेवढ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होताना दिसत नाही व त्यांचे नुकसान होते.  हा विचार समोर ठेवून शेतकरी कर्ज मित्र ही योजना कृषी कर्ज मित्र यांच्यामार्फत लवकरात लवकर मदत मिळावी या साठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना योग्य वेळेमध्ये कर्ज पुरवठा होण्यास मदत होईल.

How to apply Krushi Karj Mitra Yojana Online Registration:

  1. कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (Webside ) नोंदणी करावी.
  2. नोंदणी झालेल्या इच्छूक असलेल्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांना कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
  3. जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
  • कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.
  • कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून करून त्यानंतर शेतकऱ्यांच्या संमतीने कृषी कर्ज मित्र कर्ज मंजुरीसाठी बँकाकडे अर्ज करतील.
  • कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.

अधिक योजनांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

पीएम मित्र योजना

पीएम किसान सम्मान निधी योजना

Krushi Karj Mitra Yojana २०२१

Leave a Comment