Majhi Kanya Bhagyashree Yojana in Marathi । Majhi Bhagyashree Kanya Yojana Online Apply। features, Objectives, eligibility, benefits,। माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | MKBY Application Form | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 । माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 माहिती मराठी । माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 । माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे, योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्रे, फायदे ।
Majhi Kanya Bhagyashree Yojana in Marathi
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात, केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणे राज्य सरकारांकडूनही अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलला जातो. अशीच एक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना ( Majhi Kanya Bhagyashree Yojana) होय.1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली . या योजनेंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये मिळतात.
या योजनेमध्ये ज्या मातेने एका मुलीच्या जन्मानंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल.आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले त्या नंतर दोन्ही मुलींना 25000 रुपये म्हणजे एकूण 50,000/- रुपये बँकेत जमा केले जातील या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
माझी भाग्यश्री कन्या योजनेचे उद्दिष्ट Majhi Kanya Bhagyashree Yojana Objectives
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
- बालिकांचा जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे.
- मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
- सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
- जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चे तपशील
योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरवात | 1 एप्रिल 2016 |
अधिकृत संकेतस्थळ | maharashtra.gov.in |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुली |
उद्देश | मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी |
ही योजना योनी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप Majhi Kanya Bhagyashree Yojana Features
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल.
भाग्यश्री कन्या योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल तसेच इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण होणे व 18वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पात्रता Majhi Kanya Bhagyashree Yojana Eligibility
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अंतर्गत लाभ मिळू शकतो.
- तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे कागदपत्रे Majhi Kanya Bhagyashree Yojana Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ Majhi Kanya Bhagyashree Yojana Benefits
- माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना मिळणार आहे
- या योजनेमुळे एका मुलीला मिळणारी रक्कम 50000रुपये (18वर्ष नंतर)असणार आहे.
- दोन मुलींना मिळणारी रक्कम ही 50000रुपये (एका मुलीला 25000रु.+ दुसऱ्या मुलीला 25000रु.) असणार आहे
- माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील.
- या योजने अंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल आणि दोघांनाही 1लाख रु.चा अपघात विमा मिळेल.
- या योजनेसाठी राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना नियम आणि अटी:
- सदर योजना सर्व गटातील दारिद्र रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील कुटूंबात जन्मणाऱ्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
- सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल तसेच इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण होणे व 18वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या तर आर या दोनी मुली या योजनेस पात्र असतील .( एक मुलगी आहे आणि दुसऱ्या मुली नंतर कुटूंब नियोजन शस्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थिती मध्ये दोनी मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.)
- एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्याची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ मिळू शकेल.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजनेचा लाभ मिळेल.
- ज्या लाभ धारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजने अंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळेल.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाइल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल. त्याची पडताळणी केली जाईल. माहिती बरोबर आढळल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
Read More
- जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यादी
- सुकन्या समृद्धी योजना मराठी मध्ये
- PM-SHRI योजना म्हणजे काय?
- आईसीआईसीआई बँक वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे
वारंवार विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे ( FAQ )
माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरु झाली ?
1 एप्रिल 2016
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश काय आहे ?
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पात्रता काय आहे ?
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पत्रात या लेखात सविस्तर दिलेल्या आहेत
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ फक्त मुलींसाठी आहे का?
हो.